Oscar 2023: सर्वोत्कृष्ट चित्रपट, अभिनेता; ऑस्करमध्ये कोणी मारली बाजी?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Oscar award 2023 Winning List : 95 व्या अ‍ॅकेडमी अवॉर्ड म्हणजेच ऑस्कर अवॉर्ड सोहळ्यात भारताने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या ऑस्कर अवॉर्ड सोहळ्यात भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेलाय. RRR चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला बेस्ट ओरिजनल साँगचा (best original song oscar 2023) पुरस्कार मिळालाय.यासह द एलिफेंट व्हिस्परर्सने देखील ऑस्कर अवॉर्ड मिळालाय. प्रोड्युसर गुनीत मोंगा यांच्या द एलिफेंट व्हिस्परर्सने बेस्ट शॉर्ट डॉक्युमेंट्रीचा अवॉर्ड जिंकलाय. यासह एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अ‍ॅट वन्स सिनेमाने बेस्ट सिनेमाचा पुरस्कार पटकावला आहे. या अवॉर्ड सोहळ्यात आणखीण कोण- कोणत्या सिनेमांना,गाण्यांना आणि अभिनेत्यांना अवॉर्ड मिळाले आहेत. हे जाणून घेऊयात. (oscar 2023 best movie to best actors who won the oscar award know the details)

ऑस्कर विजेत्यांची यादी

  • एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अ‍ॅट वन्स या सिनेमातील अभिनेता के हुय क्वानने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार जिंकला.

  • एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अ‍ॅट वन्स याच सिनेमातील सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार जेमी ली कर्टिसने पटकावला आहे.

  • हे वाचलं का?

    ADVERTISEMENT

  • आयरिश गुडबाय या शॉर्ट फिल्मने सर्वोत्कृष्ट लाइव्ह अ‍ॅक्शन शॉर्ट फिल्मचा पुरस्कार जिंकलाय.

  • ऑल क्वाएट ऑन द वेस्टर्न फ्रंट या सिनेमातील सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीसाठी जेम्स फ्रेंड्सने अवॉर्ड जिंकला.

  • ADVERTISEMENT

    Naatu Naatu Win oscar: ऑस्करमध्येही ‘नाटू नाटू’चे घुमले सूर! पटकावला ‘बेस्ट ओरिजनल साँग’ अवॉर्ड

    ADVERTISEMENT

    • द व्हेलमधील सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअर स्टाईलसाठी अ‍ॅड्रिन मोरोट,जुडी चिन आणि अ‍ॅनेमेरी ब्रॅडली यांना पुरस्कार जिंकलाय.

  • ब्लॅक पॅंथर वाकांडा फॉरएव्हरसाठी रूथ कार्टरने बेस्ट कॉस्ट्युमचा अवॉर्ड जिंकला.

  • जर्मन चित्रपट ऑल क्वाएट ऑन द वेस्टर्न फ्रंट चित्रपटाला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्मचा पुरस्कार मिळालाय.

  • भारताच्या द एलिफंट व्हिस्परर्सने बेस्ट शॉर्ट फिल्मचा पुरस्कार पटकावला.

  • द बॉय, द मोल, द फॉक्स अँड द हॉर्सने सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्मचा पुरस्कार पटकावलाय.

  • The Elephant Whisperers: ऑस्करमध्ये भारताचा डंका! द एलिफंट व्हिस्परर्सने घडवला इतिहास

    • ऑल क्वाएट ऑन द वेस्टर्न फ्रंटसाठी वोलकर बर्टेलमनने बेस्ट ओरीजनल स्कोर अवॉर्ड जिंकलाय.

    • अवतार: द वे ऑफ वॉटरच्या सिनेमाने बेस्ट व्हिज्युअल इफेक्टचा पुरस्कार जिंकलाय. जो लेटरी, रिचर्ड बानेहॅम,एरिक सैंडन आणि डॅनिअल बॅरेट यांचा हा विजय आहे.

    • एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल अ‍ॅट वन्स चित्रपटासाठी डॅनियल क्वान आणि डॅनियस शिनर्ट यांनी बेस्ट ओरिजनल स्क्रिनप्लेचा पुरस्कार जिंकलाय.

    • सर्वोत्कृष्ट पटकथा वुमेन टॉकिंगसाठी सारा पोलिने पुरस्कार पटकावलाय.

    • टॉप गन मावेरीक सिनेमातील बेस्ट साऊंडसाठी मार्क वेनगार्टन, जेम्स एच. माथर, अल नेल्सन, ख्रिस बर्डन आणि मार्क टेलरने ऑक्सर जिंकलाय.

    • एसएस राजामौली यांच्या RRR सिनेमातील नाटू नाटू गाण्याने बेस्ट ओरिजनल सॉंगचा पुरस्कार पटकावलाय.

    • एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स या सिनेमातील बेस्ट इ़डीटींगसाठी पॉल रॉजर यांनी पुरस्कार जिंकलाय.

    • एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्ससाठी डॅनियल क्वान आणि डॅनियल शिनर्ट यांनी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावला आहे.

    • ब्रेंडन फ्रेझरने द व्हेलसाठी पहिला ऑस्कर जिंकलाय.

    • एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्ससाठी मिशेल योहला बेस्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

    • सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्सने पटकावला आहे.

      follow whatsapp

      ADVERTISEMENT