जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकरांचा तानाजी सावंतांनी वचपा काढला? साईड पोस्टिंगचं कारण तरी काय?
महाराष्ट्रातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या बदल्यांची ऑर्डर गुरुवारी सायंकाळी काढण्यात आली. या आदेशात अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यात उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांची देखील बदली झाली आहे. कौस्तुभ दिवेगावकर यांची बाळासाहेब ठाकरे,कृषी व्यवसाय व ग्रामीण प्रकल्प संचालक म्हणून बदली झाली आहे. त्यांना साईड पोस्ट देण्यात आली आहे. याच्या मागे आरोग्यमंत्री तानाजी सावंत आहेत का? अशी […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या बदल्यांची ऑर्डर गुरुवारी सायंकाळी काढण्यात आली. या आदेशात अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यात उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांची देखील बदली झाली आहे. कौस्तुभ दिवेगावकर यांची बाळासाहेब ठाकरे,कृषी व्यवसाय व ग्रामीण प्रकल्प संचालक म्हणून बदली झाली आहे. त्यांना साईड पोस्ट देण्यात आली आहे. याच्या मागे आरोग्यमंत्री तानाजी सावंत आहेत का? अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु झाली आहे. मागच्या महिन्यात तानाजी सावंत जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्यात वादाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यामुळेच की काय कौस्तुभ दिवेगावकर यांना साईड पोस्ट देण्यात आलीय, असं बोललं जात आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
तानाजी सावंत यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सोमनाथ रेड्डी यांना कौस्तुभ दिवेगावकर यांनी फोनवरून दमदाटी केल्याचा आरोप करण्यात आला होता. रेड्डी यांनी तसं लेखी सावंत यांना कळवलं होतं. यावरून तानाजी सावंत यांनी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याकडे दिवेगावकर यांची तक्रार केली होती. त्यामुळे सावंत आणि दिवेगावकर यांच्यातील कलह समोर आला होता. यावर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी मात्र मौन बाळगला होता.
परस्पर माहिती घेतल्याने दिवेगावकरांचा होता आक्षेप










