आमचा पक्ष काल आलेला नाही, काय करायचं ते आम्हाला ठाऊक आहे; नाना पटोलेचं राऊत यांना प्रत्युत्तर

जाणून घ्या आणखी काय म्हटलं आहे नाना पटोले यांनी?
आमचा पक्ष काल आलेला नाही, काय करायचं ते आम्हाला ठाऊक आहे; नाना पटोलेचं राऊत यांना प्रत्युत्तर

योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर

काँग्रेस पक्ष हा काल-परवाकडे आलेला पक्ष नाही. आम्हाला काय करायचं ते चांगलं ठाऊक आहे असं म्हणत नाना पटोले यांनी खासदार संजय राऊत यांना उत्तर दिलं आहे. काँग्रेस पक्षाला इतिहास आहे. एक मोठी परंपरा आहे. त्यामुळे आम्ही काय करायचं ते पाहून घेऊ असं सांगत संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेवर नाना पटोलेंनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा अभाव आहे त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत असं संजय राऊत म्हणाले होते. त्याबाबत नाना पटोलेंनी हे भाष्य केलं आहे.

काँग्रेसध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी. (संग्रहित छायाचित्र)
काँग्रेसध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी. (संग्रहित छायाचित्र)AajTak

काय म्हणाले संजय राऊत?

काँग्रेस पक्षात देशपातळीवर नेतृत्व नसल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत. त्यांनी लवकारात लवकर आपल्या पक्षातले वाद संपवून या सगळ्यावर पर्याय काढावा असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. काँग्रेस हा देशातला सर्वात मोठा पक्ष आहे. त्यांनी कुणाला अध्यक्ष नेमावं, कुणाला नाही याबाबत मी भाष्य करणार नाही. मात्र त्यावेळी ही गोष्टही मान्य केली पाहिजे की काँग्रेस पक्षाला एका सक्षम नेतृत्वाची गरज आहे. ते नसल्याने सध्या काँग्रेसमधले कार्यकर्ते संभ्रमात आहेत.

देशाच्या जडणघडणीत काँग्रेसच पक्षाचा मोठा सहभाग आहे. 60 वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांनी देशावर राज्य केलंय. देशाला अनेक मोठे नेते दिले आहेत. अशावेळी या पक्षाला नेतृत्व नसल्याने याविषयी लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. काँग्रेस पक्षाला अध्यक्षपद नाही ते द्यावे अशी मागणी केली तर ते योग्य आहे.

पुढे ते म्हणाले, राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडल्यानंतर काँग्रेस नेतृत्वहीन झाला. एखादा पक्ष नेतृत्वहीन झाला की भाजपसारखे इतर पक्षही त्याचा फायदा घेतात. कॉंग्रेस पक्ष हा या देशातल्या प्रमुख विरोधी पक्ष म्हणून राहीला नाही तर भविष्यामध्ये त्यांना राजकारण करता येणार नाही.अशा वेळा काँग्रेस नेतृत्वाने अध्यक्षपदाचा विषयी लवकरात लवकर मार्गी लावला तर नक्कीच त्यातून देशाला आणि विरोधी पक्षाच्या आघाडीला पुढे जाता येईल, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

आमचा पक्ष काल आलेला नाही, काय करायचं ते आम्हाला ठाऊक आहे; नाना पटोलेचं राऊत यांना प्रत्युत्तर
काँग्रेस नेतृत्वास हे कधी उमगणार?; शिवसेनेचं काँग्रेसला सल्ल्याचं 'टॉनिक'

याबाबत नाना पटोलेंना विचारलं असता ते म्हणाले की, संजय राऊत पत्रकार आहेत, संपादक आहेत. त्यांना त्यांचं मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे हे काँग्रेस मानतं. भाजपच्या विरोधात असं काही वक्तव्य केलं असतं तर भाजपने संजय राऊत यांच्यामागे ईडी चौकशी लावली असती. आमचा पक्ष हा जुना, जाणता आणि परंपरा असलेला पक्ष आहे. आम्हाला काय करायचं ते आम्हाला माहित आहे.

Related Stories

No stories found.