सगळ्यात मोठा उलटफेर झालेल्या KDMC च्या महापौर पदासाठी मनसेची नगरसेविका रेसमध्ये, 'ही' नावं चर्चेत!

मिथिलेश गुप्ता

केडीएमसी महापौर पदावर अनुसूचित जमाती( एसटी ) आरक्षण जाहीर होताच शिवसेनेत महापौरपदाची चुरस निर्माण झाली असून तीन नगरसेवकांची नावे चर्चेत आली आहेत.

ADVERTISEMENT

three names are being discussed for mayor post in kdmc municipal corporation and a mns corporator is also in race
KDMC महापौर पदासाठी तीन नावं चर्चेत
social share
google news

कल्याण: कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेत महापौर पदासाठी यावेळी अनुसूचित जमाती ( ST)प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. महानगरपालिकेत अनुसूचित जमातीसाठी आरक्षण जाहीर होताच शिवसेनेत महापौरपदासाठी अंतर्गत रस्सीखेच सुरू झाली आहे. या आरक्षणामुळे शिवसेना शिंदे गटाच्या हर्षाली थविल आणि किरण भांगले तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शीतल मंढारी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.

शिवसेना की मनसे.. कोणाचा होणार महापौर?

शिवसेना शिंदे गटाकडे अनुसूचित जमातीचे दोन नगरसेवक असल्याने पक्षात आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. दुसरीकडे भाजपकडे एकही अनुसूचित जमातीचा नगरसेवक नसल्यामुळे महापौर पदावरील भाजपचा दावा संपुष्टात आला आहे. तसेच मनसेने शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केल्यामुळे राजकीय समीकरणं आणखी स्पष्ट होताना दिसत आहेत. एकीकडे शिवसेना शिंदे गटाचे दोन तर दुसरीकडे मनसेचा एक असा पर्याय उपलब्ध असल्यामुळे केडीएमसीच्या महापौर पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा>> 'शिंदेंसोबत जायचं होतं तर आमच्यासोबत युती करायची नव्हती', KDMC वरून राऊत संतापले.. थेट सुनावलं!

◾शहरप्रमुख रवी पाटील समर्थित युवा दावेदार किरण भांगले आणि माजी नगरसेवकांच्या पाठिंब्याने हर्षाली चौधरी थविल यांच्यात थेट चुरस पाहायला मिळते आहे. भाजपने महापौर पदाचा दावा सोडत महायुतीचाच महापौर होणार असल्याचा स्पष्ट संकेत दिला आहे.

दरम्यान, दोन्ही दावेदारांना अज्ञात स्थळी हलवण्यात आलं असून अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार आहे. युवा महापौर की महिला महापौर, याकडे संपूर्ण कल्याण-डोंबिवलीचं लक्ष लागलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp