महाराष्ट्रात सलग दुसऱ्या दिवशी नवे Corona रुग्ण १० हजारांवर

मुंबई तक

महाराष्ट्रात सलग दुसऱ्या दिवशी १० हजारांपेक्षा जास्त नवे कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. महाराष्ट्राच्या चिंतेत भर घालणारीच ही संख्या ठरली आहे. मागील २४ तासांमध्ये १० हजार १८७ नवे कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर २४ तासांमध्ये ६ हजार ८० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या २० लाख ६२ हजार३१ […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाराष्ट्रात सलग दुसऱ्या दिवशी १० हजारांपेक्षा जास्त नवे कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. महाराष्ट्राच्या चिंतेत भर घालणारीच ही संख्या ठरली आहे. मागील २४ तासांमध्ये १० हजार १८७ नवे कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर २४ तासांमध्ये ६ हजार ८० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या २० लाख ६२ हजार३१ इतकी झाली आहे. मागील २४ तासांमध्ये ४७ मृत्यूंची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

कोरोना रूग्ण वाढू लागल्याने औरंगाबादमध्ये १० दिवसांचा Lockdown

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ६७ लाख ७६ हजार ५१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २२ लाख ८ हजार ५८६ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४ लाख २८ हजार ६७६ व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर ४ हजार ५१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला ९२ हजार ८९७ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. आज राज्यात १० हजारांपेक्षा जास्त रूग्णांची नोंद झाल्याने आता राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या २२ लाख ८ हजार ५८६ इतकी झाली आहे.

COVID टेस्टसाठी अकोल्यात गर्दी, कुठे आहे Social Distancing?

हे वाचलं का?

    follow whatsapp