अनिल देशमुखांविरोधात परमबीर सिंग यांच्याकडे कुठलेच पुरावे नाहीत, जाणून घ्या कसं समोर आलं वास्तव?

विद्या

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना परमबीर सिंग यांच्या आरोपांमुळे गृहमंत्रीपद सोडावं लागलं. आता मात्र एक नवीच माहिती समोर आली आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडे अनिल देशमुखांविरोधात काहीही पुरावे नसल्याचं समोर आलं आहे. परमबीर सिंग यांनी 20 मार्चला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून अनिल देशमुखांवर 100 कोटींचं टार्गेट सचिन वाझेला दर महिन्याला वसूल करण्यासाठी दिलं होतं असा आरोप केला होता. त्यामुळे एप्रिल महिन्यात अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपद सोडावं लागलं होतं.

परमबीर सिंग यांनी चंदिगढमध्ये एक पॉवर ऑफ अॅटर्नी तयार केली आहे. त्यामध्ये महेश पांचाळ या व्यक्तीला परमबीर सिंग यांचे प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. प्रतिज्ञापत्रात पुढे म्हटले आहे की सिंग यांच्याकडे कोणाचेही नेतृत्व किंवा उलटतपासणी करण्याचा कोणताही पुरावा नाही. जी एक सदस्याची समिती नेमण्यात आली आहे त्या समितीसमोर सादर करण्यासाठी परमबीर सिंग यांच्याकडे काहीही नाही असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

महाराष्ट्र सरकारने याच वर्षी मार्च महिन्यात अनिल देशमुख यांच्याविरोधात जे आरोप झाले त्यासाठी चांदीवाल समिती स्थापन केली होती. आयोगाने या प्रकरणी परमबीर सिंग यांना अनेक समन्स धाडण्यात आले होते. मात्र ते हजर राहिले नाही. आयोगाने त्यांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंटही काढलं होतं. आयोगासमोर हजर न राहिल्याने परमबीर सिंग यांच्यावर आधी पाच हजारांचा दंड आणि त्यानंतर इतर दोनदा 25-25 हजारांचा दंड असा 55 हजारांचा दंडही लागू केला आहे. आता या प्रकरणी त्यांचं प्रतिज्ञापत्र समोर आलं आहे. या प्रतिज्ञापत्रात हा उल्लेख आहे की परमबीर सिंग यांच्याकडे अनिल देशमुखांविरोधात देण्यासाठी काही पुरावे नाहीत. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेलं एक पत्र सोडलं तर पुरावा म्हणून त्यांच्याकडे काहीही नाही असं यात नमूद कऱण्यात आलं आहे.

Anil Deshmukh: ‘मी सरळमार्गी आणि नैतिकतेला धरुन चालणारा माणूस..’, पाहा अनिल देशमुख काय म्हणाले

ADVERTISEMENT

परमबीर सिंग यांनी मार्च महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र पाठवलं होतं. या पत्रात त्यांनी दोन प्रमुख आरोप केले होते. त्यातला पहिला आरोप हा होता की अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला मुंबईतील बार आणि रेस्तराँमधून दर महिन्याला 100 कोटी रूपये वसूल करण्याचे आदेश दिले होते. तर दुसरा आरोप हा होता की अनिल देशमुखांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि बढत्यांमध्ये ढवळाढवळ केली.

ADVERTISEMENT

गेल्या अनेक महिन्यांपासून परमबीर सिंग यांचा पत्ता नाही. ते देशाबाहेर गेले आहेत अशी माहिती राज्य सरकारनेही कोर्टामध्ये दिली. दरम्यान अनिल देशमुख हेदेखील समोर आले नव्हते. मात्र 1 नोव्हेंबरला ते ईडी कार्यालयात पोहचले. त्यानंतर ईडीने त्यांची चौकशी केली आणि त्यानंतर त्यांना अटक केली. त्यांना अटक झाल्यानंतर मंगळवारी म्हणजेच 2 नोव्हेंबरला कोर्टात हजर कऱण्यात आलं होतं. कोर्टाने त्यांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांची दिवाळी तुरुंगातच जाणार आहे. मंगळवारीच या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर आता हे प्रतिज्ञापत्र समोर आलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT