योगेश जगताप हत्या : तिन्ही आरोपी अटकेत, आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या हजरजबाबीपणामुळे आरोपी जाळ्यात

१८ डिसेंबर रोजी सांगवी भागात झाली होती योगेश जगतापची हत्या
योगेश जगताप हत्या : तिन्ही आरोपी अटकेत, आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या हजरजबाबीपणामुळे आरोपी जाळ्यात

- समीर शेख, पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड मध्ये सांगवी भागात १८ डिसेंबरला स्थानिक गुंड योगेश जगतापची तीन आरोपींनी गोळ्या झाडत हत्या केली. या हत्याकांडात सहभागी असलेले आरोपी गणेश मोटे, महेश माने आणि आश्विन चव्हाण यांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे चाकण भागात एका वेगळ्याच गुन्ह्याचा तपास करायला गेलेल्या पोलीस पथकाला या आरोपींविषयी माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी नियोजनबद्ध कारवाई करत या तिन्ही आरोपींना बेढ्या ठोकल्या आहेत.

पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश हे देखील या कारवाईत सहभागी झाल्याची माहिती कळत असून त्यांनी दाखवलेल्या हजरजबाबीपणामुळे हे सर्व आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याचं कळतंय.

योगेश जगताप हत्या : तिन्ही आरोपी अटकेत, आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या हजरजबाबीपणामुळे आरोपी जाळ्यात
Ganesh Marne Murder Conspiracy : कुख्यात गुंड शरद मोहोळसह सर्वांची निर्दोष मुक्तता

मिळालेल्या माहितीनुसार चाकण परिसरात एका एटीएम मशिनमधुन पैसे लुटल्याप्रकरणी आयुक्त कृष्णप्रकाश घटनास्थळी माहिती घेत होते. याचदरम्यान त्यांना योगेश जगतापच्या हत्येतील तिन्ही आरोपी चाकण जवळील कोये गावात लपून बसल्याचं समजलं. यानंतर कृष्णप्रकाश यांनी पोलिसांची चार पथकं तयार करुन कोये गावात तिन्ही आरोपींची शोधमोहीम राबवली. यादरम्यान हे आरोपी शेतातील एका घरात लपून बसल्याचं पोलिसांना समजलं.

पोलीस या ठिकाणी कारवाईसाठी दाखल होताच आरोपींना कुणकुण लागली. पोलिसांचं एक पथक कारवाईसाठी घराजवळ आलं असता, आरोपींनी आपल्याजवळ असलेल्या पिस्तुलातून दोन गोळ्या पोलीस पथकाच्या दिशेने चालवल्या. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही आरोपींच्या दिशेने तीन गोळ्या चालवल्या. परंतू या कारवाईदरम्यान अंधाराचा फायदा घेत आरोपी पळून जात असल्याचं लक्षात येताच आयुक्त कृष्णप्रकाश यांनी जमिनीवर पडलेल्या वाळलेल्या झाडाचा एक मोठा भाग आरोपींच्या दिशेने फेकला. यामुळे आरोपी गोंधळून गेले आणि पोलिसांनी त्यांना जेरबंद केलं.

योगेश जगताप हत्या : तिन्ही आरोपी अटकेत, आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या हजरजबाबीपणामुळे आरोपी जाळ्यात
पुणे : भर चौकात पैलवानाची गोळ्या घालून हत्या; थरारक घटना सीटीटीव्हीत कैद

या कारवाईत कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याला जखमा झालेल्या नसल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. रात्रीच्या वेळी जंगल परिसरात झालेल्या या कारवाईत काही पोलिसांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. १८ डिसेंबरला या तिन्ही आरोपींनी योगेश जगतापची हत्या केली होती, यानंतर आरोपींनी आपला पिस्तुलासोबतचा एक व्हिडीओ स्टेटसवर ठेवला होता.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in