तुळजाभवानीच्या प्राचीन खजिन्यावर डल्ला : तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी अखेर अटकेत
– गणेश जाधव, उस्मानाबाद प्रतिनिधी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या प्राचीन खजिन्यावर डल्ला मारणाऱ्या तत्कालीन धार्मिक व्यवस्थपक दिलीप नाईकवाडी याला तुळजापूर पोलिसांनी अटक केली आहे, गुन्हा नोंद झाल्यापासून नाईकवाडी तब्बल 1 वर्ष फरार होता मात्र अखेर त्याला पोलिसांनी अटक केली आहे. नाईकवाडी यांनी 35 तोळे सोने , 71 किलो चांदी व 71 प्राचीन नाणी गायब […]
ADVERTISEMENT

– गणेश जाधव, उस्मानाबाद प्रतिनिधी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या प्राचीन खजिन्यावर डल्ला मारणाऱ्या तत्कालीन धार्मिक व्यवस्थपक दिलीप नाईकवाडी याला तुळजापूर पोलिसांनी अटक केली आहे, गुन्हा नोंद झाल्यापासून नाईकवाडी तब्बल 1 वर्ष फरार होता मात्र अखेर त्याला पोलिसांनी अटक केली आहे. नाईकवाडी यांनी 35 तोळे सोने , 71 किलो चांदी व 71 प्राचीन नाणी गायब केल्याप्रकरणी गेल्या वर्षी 13 सप्टेंबर 2020 रोजी गुन्हा नोंद होता.
नाईकवाडी यांच्या 17 वर्षाच्या कालावधीत त्यांनी टप्या टप्याने पुरातन नाणी गायब केली आहेत त्यामुळे या काळात त्यांना कोण मदत केली ? त्यांचे साथीदार व सूत्रधार कोण ? ही नाणी सध्या कुठे आहेत यासह अन्य बाबी तपासात समोर येणार आहे.
पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर कल्याणराव गंगणे यांनी त्याचे वकील शिरीष कुलकर्णी मार्फत तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्याकडे 9 मे 2019 रोजी याबाबत लेखी तक्रार केली होती, त्यांनतर तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी तात्काळ याचे गांभीर्य ओळखून चौकशी समिती नेमली होती त्यात अनेक धक्कादायक प्रकार समोर आले.