ब्लॅकमेलिंग प्रकरणात रेणू शर्माच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांनी वाढ

धनजंय मुंडेंकडून खंडणी मागण्याच्या प्रकरणात रेणू शर्माला पोलिसांनी केली अटक
ब्लॅकमेलिंग प्रकरणात रेणू शर्माच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांनी वाढ

धनंजय मुंडे यांना 5 कोटी रुपये रोख व 5 कोटी रुपयांचे दुकान घेऊन द्या नाहीतर तुमच्यावर केस करून सोशल मीडियावरून बदनामी करेन, अशी धमकी रेणू शर्माने दिली होती. या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी मुंबई पोलिसांत तक्रार दिली होती. या आधारावर मुंबई क्राईम ब्रँचने रेणू शर्माला 21 एप्रिलला अटक करुन न्यायालयासमोर हजर केलं होतं. यावेळी कोर्टाने रेणू शर्माला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. आज ही कोठडी संपल्यामुळे तिला पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. यावेळी न्यायालयाने रेणू शर्माच्या कोठडीत दोन दिवसांनी वाढ केली आहे.

धनंजय मुंडे यांनी दिलेल्या तक्रारी सोबत दाखल केलेले पुरावे प्राथमिक दृष्ट्या खरे असल्याचे दिसत असल्याचं मत कोर्टाने व्यक्त केलं. रेणू शर्माने पैश्यांची उधळपट्टी करत महागडे मोबाईल्स व अन्य मौल्यवान वस्तू विकत घेतल्याचे पुरावे समोर आले आहेत. या प्रकरणी अधिक तपास व चौकशी व्हावी या दृष्टीने रेणूच्या पोलीस कोठडीत 25 एप्रिल पर्यंत वाढवण्यात आली आहे. पोलीस रेणू शर्माच्या बँक खात्याची आणि मालमत्तांचीही चौकशी करणार आहे.

Related Stories

No stories found.