आमच्या मुलीची बदनामी थांबवा! पुजाच्या कुटुंबाची पत्रातून मागणी
गेल्या काही दिवसांपासून २२ वर्षीट टिकटॉक स्टार पूजा चव्हाण हिच्या आत्महत्याप्रकरणावरुन राज्यात मोठं वादळ निर्माण झालं आहे. याप्रकरणात पुजा चव्हाणसोबत नाव जोडल्या गेलेल्या वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्विकारला आहे. विरोधक या प्रकरणात गलिच्छ राजकारण करत असून, पोलिसांना योग्य तपास करुन चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. अवश्य […]
ADVERTISEMENT

गेल्या काही दिवसांपासून २२ वर्षीट टिकटॉक स्टार पूजा चव्हाण हिच्या आत्महत्याप्रकरणावरुन राज्यात मोठं वादळ निर्माण झालं आहे. याप्रकरणात पुजा चव्हाणसोबत नाव जोडल्या गेलेल्या वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्विकारला आहे. विरोधक या प्रकरणात गलिच्छ राजकारण करत असून, पोलिसांना योग्य तपास करुन चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
अवश्य वाचा – संजय राठोड यांनी राजीनाम्यात काय म्हटलंय, जाणून घ्या…
यावेळी बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी पुजा चव्हाण यांचं कुटुंबिय आपल्याला भेटून गेलं आणि या भेटीत त्यांनी आपल्या मुलीची होणारी बदनामी थांबवा अशी मागणी केली आहे. पुजा चव्हाणच्या पालकांनी लिहीलेल्या पत्रात नेमक्या काय भावना मांडल्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.
अवश्य वाचा – एखाद्याला आयुष्यातून उठवायचंच आहे असा तपास होता कमा नये !