रिक्षातून ओढून बेदम मारहाण करत गळा चिरला, डोंबिवलीतली धक्कादायक घटना

जाणून घ्या काय घडलं आहे डोंबिवलीत?
रिक्षातून ओढून बेदम मारहाण करत गळा चिरला, डोंबिवलीतली धक्कादायक घटना

रिक्षातील प्रवाशाला रस्त्यात थांबवून चोरीच्या उद्देशाने दोन जणांना ठोसे- बुक्क्यांनी, चाकूने मारहाण करून त्यातील एकाची हत्या करण्यात आली. तर दुसऱ्याला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना रात्री साडे बाराच्या सुमारास ठाकुर्ली समांतर रस्ता परिसरात घडली. बेचनप्रसाद चौहान असे मयत तरुणाचे नाव असून बबलू चौहान असे जखमी तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी डोंबिवली टिळक नगर पोलीस व रेल्वे पोलिसांनी तपास सुरू केला आहे

डोंबिवली पूर्वेतील शेलार नाका परिसरामध्ये बेचेन आणि बबलू चव्हाण हे भाड्याने राहत होते. उत्तरप्रदेश येथे गावी जाण्यासाठी काल रात्री दीड च्या गाडीने कल्याण रेल्वे स्थानकाहून ते दोघे जाणार होते. त्यासाठी रिक्षाने ते शेलारनाका येथून साडे बाराच्या सुमारास ठाकुर्ली येथील समांतर रोडने जात होते. त्याचवेळी अनोळखी इसमानी त्यांची रिक्षा अडवून रिक्षा चालकास पळवून लावले. त्यानंतर बेचन आणि बबलू यांना चाकूच्या धाकाने त्यांच्याकडील पैसे आणि मौल्यवान वस्तू हिसकावण्याचा प्रयत्न करत त्यांना मारहाण करून शेजारील ठाकुर्ली रेल्वे ट्रॅकवर नेले. तेथे त्यांच्यावर चाकूने वार केले. यात बबलूने आरोपीच्या तावडीतून कसाबसा आपला जीव वाचून तेथून पळ काढला.

मात्र बेचन हा त्यांच्या तावडीत सापडला. जखमी बबलूने ही माहिती पहाटे शेलार नाका येथील घरी पोहचला घडलेला प्रकार त्याने भाजप पदाधिकारी यांना सांगितला. या प्रकरणाची माहिती मिळताच जखमीला सोबत घेऊन टिळकनगर पोलिस ठाण्यात पोहचले. बबलूला बेचन जिवंत आहे की नाही याबाबत काहीच माहिती नव्हती. पोलिस बबलूने दिलेल्या माहितीनुसार पोलीस घटनास्थळी पोचले. त्याठिकाणी बेचनचा मृतदेह छिन्नविच्छीन्न अवस्थेत आढळून आले. लुटीच्या इराद्याने ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

ही हत्या की रेल्वे अपघात मृत्यू ? याचा तपास करण्यासाठी रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजची मदत रेल्वे पोलीस आणि टिळकनगर पोलीस घेऊन तपास करीत आहेत. दरम्यान कल्याण डोंबिवली समांतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रात्रीच्या वेळात गर्दुल्ले वावरत असून येथील नागरिक भीतीच्या छायेत जगत आहेत. त्यामुळे या परिसरात रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्याची मागणी केली जात आहे तसेच काही दिवसापासून टिळकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हे वाढत असून पोलीस कुठे कमी पडत आहे का ? आणि गर्दुल्ल्यांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in