रश्मी ठाकरेंना महाराष्ट्राची राबडी देवी म्हटल्याचे प्रकरण, पुणे सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा ट्विटरवर महाराष्ट्राची राबडी देवी असा उल्लेख करणाऱ्या जितेन गजारियाविरुद्ध पुणे सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गजारिया हे भाजपच्या सोशल मीडिया विभागाचे महाराष्ट्र प्रमुख आहेत. गजारिया यांच्या ट्विटनंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगायला सुरुवात झाली आहे.

मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने गजारिया यांची आपल्या कार्यालयात कसून चौकशी केली होती. सुमारे साडेचार तासांच्या चौकशीनंतर गजारिया यांना जाऊ देण्यात आलं होतं. यानंतर पुणे पोलिसांनी गजारियांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सायबर पोलिसांचं एक पथक त्यांना अटक करण्यासाठी मुंबईला निघाल्याची माहिती कळते आहे.

‘महाराष्ट्राच्या राबडीदेवी’ असं रश्मी ठाकरेंना भाजपने संबोधलं, शिवसेनेचा तिळपापड का होतो आहे?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

याव्यतिरीक्त गजारिया यांच्याविरुद्ध जात आणि धर्माविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दलही IPC च्या 153 A, 500 आणि 500(2) कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही याविषयी भाष्य करत भाजपला उद्धव आणि आदित्य ठाकरेंविरुद्ध बोलण्यासाठी काहीही मुद्दा उरलेला नसल्यामुळे रश्मी ठाकरेंचं नाव मध्ये ओढलं जात असल्याची टीका केली होती.

NCP माजी आमदार विद्या चव्हाण यांना अमृता फडणवीसांची मानहानीची नोटीस, जाणून घ्या काय आहे प्रकरण…

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT