एकनाथ खडसेंना मोठा धक्का, पत्नीचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसेंचा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. यासोबत कोर्टाने मंदाकिनी खडसे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्यासाठी हा मोठा धक्का समजला जात आहे. भोसरी MIDC घोटाळ्याप्रकरणी मंदाकिनी खडसे यांना ED ने आतापर्यंत अनेक समन्स बजावले होते. पण त्या ईडीसमोर […]
ADVERTISEMENT

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसेंचा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. यासोबत कोर्टाने मंदाकिनी खडसे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्यासाठी हा मोठा धक्का समजला जात आहे.
भोसरी MIDC घोटाळ्याप्रकरणी मंदाकिनी खडसे यांना ED ने आतापर्यंत अनेक समन्स बजावले होते. पण त्या ईडीसमोर हजर झाल्या नव्हत्या. दुसरीकडे त्याविरोधात एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसें यांनी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. मात्र आज (12 ऑक्टोबर) त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे मंदाकिनी खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे, उपनिबंधक रवींसरा मुळ्ये आणि खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्याविरुद्ध पुणे जमीन व्यवहार प्रकरणात ईडीने आरोपपत्र दाखल केल्यानंतर पीएमएलए न्यायालयाने प्रक्रिया सुरू केली होती.
ईडीने 3 सप्टेंबर रोजी या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर सर्व आरोपींना न्यायालयात हजर राहावे लागले पण मंदाकिनी खडसे हजर राहण्यात अपयशी ठरल्या त्यामुळे त्यांचा अटकपूर्व जामीन अर्जही न्यायालयाने फेटाळला आहे.