Queen Elizabeth Death: कोहिनूर हिरा असलेला मुकुटाचं काय होणार? सोशल मीडियावर चर्चा

जाणून घ्या महाराणी एलिझाबेथ यांनी याबाबत काय घोषणा केली होती?
Queen Elizabeth's Death Kohinoor Crown Will Go To Camilla Says Report
Queen Elizabeth's Death Kohinoor Crown Will Go To Camilla Says Report

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं गुरूवारी निधन झालं. १९५२ मध्ये त्यांनी महाराणी म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यानंतर त्या तह हयात महाराणी या पदावर होत्या. सात दशकांची प्रदीर्घ कारकिर्द पार पाडल्यानंतर वयाच्या ९६ व्या वर्षी महाराणी एलिझाबेथ यांनी अखेरचा श्वास घेतला. क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांना जगभरातून श्रद्धांजली वाहिली जाते आहे. अशात त्यांचा कोहिनूर हिरा असलेल्या मुकुटाचं काय होणार ही चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

सोशल मीडियावर रंगली आहे कोहिनूरची चर्चा

क्वीन एलिझाबेथ यांचं निधन झाल्यानंतर जगभरातून त्यांना आदरांजली वाहिली जाते आहे. अशात ट्विटरवर कोहिनूर हिरा चांगलाच चर्चेत आहे. ट्विटरवर कोहिनूरवर हजारो ट्विट करण्यात आले आहेत.

महाराणी एलिझाबेथ यांच्या मृत्यूनंतर कोहिनूर हिरा का होतोय ट्रेंड?

महाराणी एलिझाबेथ यांच्या मृत्यूनंतर कोहिनूर हिरा ट्रेंड होण्याचं कारण आहे ते म्हणजे महाराणींचा मुकुट. राणी एलिझाबेथ यांच्या मुकुटात भारतातील प्रसिद्ध कोहिनूर हा हिरा जडवण्यात आला आहे. एवढंच नाही तर या मुकुटात दोन हजाराहून अधिक हिरे आहेत असंही सांगण्यात येतं आहे. सोशल मीडियावर कोहिनूर हिरा परत आणला जावा अशी चर्चा होते आहे.

Crown with Kohinoor
Crown with Kohinoor

२ जून १९५२ पासून क्वीन एलिझाबेथ या ब्रिटनच्या राजगादीवर विराजमान झाल्या. राज्याभिषेक झाल्यापासून त्यांनी सात दशकं महाराणी म्हणून त्यांची कारकीर्द पाहिली. या संपूर्ण कारकिर्दीत महाराणी एलिझाबेथ यांनी ब्रिटनचे १५ पंतप्रधानही पाहिले. अशात आता चर्चा सुरू झाली आहे की राणीच्या मुकुटात असलेल्या कोहिनूरचं काय होणार?

२०२२ च्या सुरूवातीलाच महाराणी एलिझाबेथ यांनी एक महत्त्वाची घोषणा केली होती. प्रिन्स चार्ल्स हे जेव्हा ब्रिटनच्या सिंहासनावर विराजमान होतील तेव्हा त्यांच्या पत्नीला म्हणजेच कॅमिला यांना हा कोहिनूर हिरा असलेला मुकुट मिळेल असा आदेश महाराणी एलिझाबेथ यांनी काढला होता. NDTV ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. १०५.६ कॅरेटाचा कोहिनूर हिरा हा भारतातला प्राचीन हिरा म्हणून ओळखला जातो. १४ व्या शतकात हा हिरा भारतात होता. त्यानंतर शतकानुशतकं या हिऱ्याचे मालक बदलत गेले.

Queen Elizabeth's Death Kohinoor Crown Will Go To Camilla Says Report
Queen Elizabeth : सात दशकांचा गौरवशाली प्रवास इतिहासजमा, कशी होती क्वीन एलिझाबेथ यांची कारकीर्द?

ब्रिटनच्या राजमुकुटात कसा आला कोहिनूर हिरा?

१८४९ मध्ये ब्रिटिशींना भारतातल्या पंजाबवर ताबा मिळवला. त्यानंतर कोहिनूर हिरा राणी व्हिक्टोरिया यांच्या मुकुटात जडवण्यात आला. तेव्हापासूनच हा हिरा ब्रिटनच्या राजघराण्यातील राजमुकुटाचा अविभाज्य भाग झाला आहे. एलिझाबेथ द्वितीय यांनी २५ व्या वर्षी ६ फेब्रुवारी १९५२ ला ब्रिटनचं महाराणी पद स्वीकारलं होतं. त्यानंतर हा मुकुट त्यांच्याकडे आला. आता हा मुकुट त्यांच्या सुनेकडे म्हणजेच चार्ल्स यांची पत्नी कॅमिला यांच्याकडे जाईल असं रिपोर्ट सांगतो. सध्या महाराणींच्या निधनानंतर मात्र कोहिनूर हिऱ्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in