ड्रग्ज केसमध्ये आर्यन खान अडकल्याचं पाहून व्यथित झाले राहुल गांधी, शाहरुख खानला लिहिलं पत्र..
ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अडकला होता. त्याला 2 ऑक्टोबरला अटकही झाली. त्यानंतर पुढचे 25 दिवस तो तुरुंगात होता. 28 ऑक्टोबरला त्याला जामीन मंजूर झाला आणि त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच 30 ऑक्टोबरला तो तुरुंगाबाहेरही आला. तरीही शाहरुख खान आणि गौरी खान म्हणजेच आर्यनचे आई वडिल आर्यनच्या मानसिक आरोग्याबाबत त्याची खास काळजी घेत […]
ADVERTISEMENT

ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अडकला होता. त्याला 2 ऑक्टोबरला अटकही झाली. त्यानंतर पुढचे 25 दिवस तो तुरुंगात होता. 28 ऑक्टोबरला त्याला जामीन मंजूर झाला आणि त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच 30 ऑक्टोबरला तो तुरुंगाबाहेरही आला. तरीही शाहरुख खान आणि गौरी खान म्हणजेच आर्यनचे आई वडिल आर्यनच्या मानसिक आरोग्याबाबत त्याची खास काळजी घेत आहेत. अशात राहुल गांधी यांनी अभिनेता शाहरुख खानला पत्र लिहिलं होतं अशी माहिती आता समोर आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 14 ऑक्टोबरला राहुल गांधी यांनी शाहरुख आणि गौरी या दोघांना एक पत्र लिहिलं होतं. यामध्ये त्यांनी ड्रग्ज केसमध्ये आर्यन खानचं नाव आल्याने आणि तो या प्रकरणात अडकल्याने चिंता व्यक्त केली होती. त्यावेळी आर्यन खान प्रकरण हा देशभरात चर्चेचा विषय होता.