Rahul Gandhi Speech : ‘तुम्ही देशद्रोही आहात’, राहुल गांधींचं मोदींवर शरसंधान
मणिपूर हिंसाचारावरून मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. यावर बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केला.
ADVERTISEMENT

Rahul Gandhi on No Confidence Motion : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्ला चढवला. मणिपूरमधील हिसाचारावरून काँग्रेसने मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. या प्रस्तावावर बोलताना राहुल गांधींनी मोदी सरकारला घेरले.
राहुल गांधी लोकसभा अध्यक्षांना म्हणाले की, “सर्वात आधी मी आपले आभार मानतो. कारण मला पुन्हा लोकसभेचं सदस्यत्व बहाल केले. माझ्या भाजपच्या मित्रांना घाबरण्याची गरज नाही. माझे आजचे भाषण अदाणींवर नाहीये. तुम्ही आरामात रहा. माझे आजचे भाषण दुसऱ्या मुद्द्यांवर आहे. रुमीने म्हटलेले आहे की, जे शब्द ह्रदयातून येतात, ते ह्रदयापर्यत पोहोचतात. आज मी ह्रदयातून बोलत आहे.”
– “मागच्या वर्षी 130 दिवस मी भारतातल्या एका टोकावरून दुसऱ्या टोकाला गेलो होतो. समुद्र किनाऱ्यापासून ते बर्फाळ डोंगरापर्यंत मी चाललो. या यात्रेदरम्यान मला लोकांनी विचारलं की तू का चालत आहे. काय उद्दिष्ट आहे. सुरुवातीला माझ्याकडे उत्तर नव्हते. ही यात्रा का सुरू केली, हे कदाचित मलाही माहिती नव्हते. मला भारत समजून घ्यायचा होता. लोकांमध्ये जायचं होतं.”
– “ज्या गोष्टीवर माझं प्रेम होतं. ज्या गोष्टीसाठी मृत्यू पत्करायलाही तयार आहे. ज्या गोष्टीसाठी मी मोदींच्या तुरुंगात जायला तयार होतो. मी 10 वर्षे शिव्या खाल्ल्या. ती गोष्ट मला समजून घ्यायची होती.”