राज ठाकरेंनी खास चित्रातून वाहिली बाबासाहेब पुरंदरेंना आदरांजली

मुंबई तक

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाच्या शंभराव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना ट्विटरवरून आणि पुण्यात जाऊनही आदरांजली वाहिली होती. आज एक खास चित्र काढून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राज ठाकरे हे त्यांच्या खास व्यंगचित्रांच्या शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. आता त्यांनी जे चित्र काढलं आहे ते देखील याच […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाच्या शंभराव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना ट्विटरवरून आणि पुण्यात जाऊनही आदरांजली वाहिली होती. आज एक खास चित्र काढून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राज ठाकरे हे त्यांच्या खास व्यंगचित्रांच्या शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. आता त्यांनी जे चित्र काढलं आहे ते देखील याच शैलीतलं आहे.

काय आहे या चित्रात?

बाबासाहेब पुरंदरे हे स्वर्गात पोहचले आहेत, तिथे छत्रपती शिवाजी महाराजांजवळ ते पोहचले आहेत. महाराज त्यांना म्हणत आहेत की, ‘ये रे माझ्या गड्या, मला शोधण्यासाठी जन्मभर पायपीट केलीस, अविश्रांत मेहनत घेतलीस. माझ्यासाठी संपूर्ण आय़ुष्य खर्ची घातलंस. आता ये आराम कर.’ असं म्हणत हे व्यगचित्र रेखाटण्यात आलं आहे. शिवाज्ञा असा मथळाही या व्यंगचित्राला देण्यात आला आहे.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं सोमवारी पहाटे पुण्यात निधन झालं. वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाल्याची भावना समाजातल्या सगळ्याच दिग्गजांनी व्यक्त केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही बाबासाहेब पुरंदरेंना आदरांजली वाहिली आहे.

बाबासाहेब पुरंदरे: ‘जाणता राजा’ कसं घडलं?, जाणून घ्या त्यामागची इंटरेस्टिंग कथा

काल काय म्हणाले होते राज ठाकरे?

इतिहास संशोधक, शिवचरित्रकार, महाराष्ट्र भूषण सन्माननीय बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विनम्र श्रद्धांजली ‘बाबासाहेबांनी आपलं आयुष्य शिवचरित्र सांगण्यासाठी खर्च केलं. परंतु असं असतानाही वर्तमानातील प्रश्न आणि भविष्यातली आव्हानं ह्याबाबत त्यांच्याकडून कायमच मार्गदर्शन मिळत राहिलं. माझ्या व्यक्तिगत आयुष्यात ते माझे मार्गदर्शक तर होतेच, पण मला पितृतुल्यही होते.

बाबासाहेब मला नेहमी सांगत, ‘महाराजांचा जिथे जिथे पदस्पर्श झाला आहे, तिथे तिथे मी आजपर्यंत अनेकदा गेलो आहे. आता फक्त एकच जागा उरली आहे ती म्हणजे महाराज जिथे गेले आहेत तिथे जायची”. शिवछत्रपती महाराजांचा सेवक आज साक्षात छत्रपतींची सेवा करण्यासाठी निघाला. इतिहास संशोधक, शिवचरित्रकार, महाराष्ट्र भूषण, सन्माननीय बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विनम्र श्रद्धांजली’ असं ट्विट करत राज ठाकरेंनी बाबासाहेब पुरंदरे यांना आदरांजली वाहिली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp