स्वाभिमानीचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांची हकालपट्टी,राजू शेट्टींनी केली घोषणा

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

धनंजय साबळे, प्रतिनिधी, अमरावती

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अमरावती जिल्ह्यातील एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतुन अधिकृत रित्या हकालपट्टी करून त्यांचं निलंबन करण्याची घोषणा स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी अमरावतीच्या हिवरखेड येथील शेतकरी मेळाव्यात केली. आमदार देवेंद्र भुयार हे शेतकरी संघटनेत सक्रिय नसल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. देवेंद्र भुयार यांना विजयी करण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांनी वर्गणी गोळा करून त्यांना विजयी केलं मात्र शेतकऱ्यांचा विश्वासघात त्यांनी केला असा आरोप त्यांच्यावर राजू शेट्टी यांनी केला.

त्याआधी राजू शेट्टी यांनी देवेंद्र भुयार यांच्यावर सडकून टिकाही केली. तर हिवरखेड येथील शेतकरी मेळाव्यात देवेंद्र भुयार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून त्यांची हकालपट्टीची मागणी अमरावतीतुन करण्यात येत होती. तर राजू शेट्टी यांनी त्यांच्याच पक्षाच्या एकमेव आमदारावर कारवाई केल्याने आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा राज्यात एकही आमदार उरलेला नाही.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र भुयार यांची राष्ट्रवादी काँग्रेससोबत जवळीक वाढली. विधानसभेच्या निवडणुकीत देवेंद्र भुयार यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढवली होती. शेतकरी आमदार म्हणून निवडून आलेले ते एकमेव आमदार होते. देवेंद्र भुयार यांना मंत्रिपद मिळावं यासाठीही सुरूवातीला राजू शेट्टी यांनी प्रयत्न केले होते. मात्र भुयार यांनी काही पक्षांशी जवळीक वाढवली. त्यानंतर अखेर राजू शेट्टी यांनी देवेंद्र भुयार यांची हकालपट्टी केली आहे.

ADVERTISEMENT

भुयार पक्षाला जुमानत नसल्याचे अनेकदा पक्षाच्या लक्षात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा खिशाला बिल्ला सुध्दा लावत नसल्याचे अनेक कार्यकर्त्यांनी वरिष्ठांच्या कानावर घातले.पत्रकार परीषदेत विदर्भ अध्यक्ष दामू अण्णा यांनी देवेंद्र भुयार यांची पक्षातून हकालपट्टी करा अशी मागणी केली. तेव्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेत मतभेद असल्याचे पहिल्यांदा चव्हाट्यावर आले.

ADVERTISEMENT

देवेंद्र भुयार यांची फेसबुक पोस्टही चर्चेत

देवेंद्र भुयार यांची स्वाभिमानीमधून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर त्यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. ही फेसबुक पोस्टही चर्चेत आहे. धन्यवाद असं एका ओळीची पोस्ट करत देवेंद्र भुयार यांनी हकालपट्टीला उत्तर दिलं आहे. याचाच अर्थ ही कारवाई आपल्यावर होणार ही त्यांनाही कुठेतरी अपेक्षा होतीच असंही आता बोललं जातं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT