भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर रक्षा खडसेंच्या नावापुढे ‘तो’ उल्लेख

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर खासदार रक्षा खडसे यांच्या नावापुढे आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला. त्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून तातडीने भाजपने याबाबत कारवाई करवाई अन्यथा सायबर सेल पुढची कारवाई करेल असंही स्पष्ट केलं आहे.

BJP.org ही भाजपची अधिकृत वेबसाईट आहे. भाजपच्या या अधिकृत वेबसाईटवर खासदार रक्षा खडसे यांच्या नावापुढे आता कोणताही आक्षेपार्ह उल्लेख दिसत नाहीये. तो उल्लेख तातडीने हटवण्यात आला आहे. फक्त महाराष्ट्रातल्याच नाही तर देशभरातल्या खासदारांची यादी वेबसाईटवर उपलब्ध आहे. रक्षा खडसे यांच्याबाबत जो आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला होता त्याचा स्क्रिन शॉट पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी ट्विटरवर शेअर केला. ज्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. हा प्रकार गुगल ट्रान्सलेशनमुळे झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काय म्हटलं आहे?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

“भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर भाजप खासदार रक्षा खडसे यांच्या नावापुढे असलेलं अपमानजनक वर्णन पाहून धक्काच बसला. अशा प्रकारे महिलांचा अपमान करणाऱ्यांची गय महाराष्ट्र सरकार कधीही करणार नाही. भाजपनं या प्रकरणातल्या दोषींवर तातडीने कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्र सायबर सेलला कठोर कारवाई करावी लागेल. “

रक्षा खडसे यांनी काय म्हटलं आहे?

ADVERTISEMENT

मी आमच्या पक्षाची वेबसाईट चेक केली त्यावेळी असा कोणताही आक्षेपार्ह उल्लेख मला माझ्या नवासमोर दिसला नाही. ज्या लोकांनी स्क्रिन शॉट व्हायरल केला आहे ते पेज सेव्ह महाराष्ट्र फॉर बीजेपी असं आहे. या पेजवरुन या सगळ्या गोष्टी व्हायरल होत आहेत. कदाचित माझी बदनामी करण्यासाठी कुणीतरी फोटोशॉपचा आधार घेऊन हे केलं असावं अशी शंका मला येते आहे.

ADVERTISEMENT

रक्षा खडसे या रावेरमधून भाजपच्या खासदार आहेत. एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला असला तरीही रक्षा खडसे या अद्याप भाजपमध्येच आहेत.

चंद्रकांत पाटील यांनी काय म्हटलं आहे?

चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे त्यांनी यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरही टीका केली आहे. रक्षा खडसेंच्या नावापुढे आक्षेपार्ह उल्लेख कसा आला हे भाजप शोधून काढेल. मात्र गृहमंत्री अनिल देशमुख यांना जर खरंच महिलांविषयीचा कळवळा असता तर त्यांनी आक्षेपार्ह मजकुरासहीत फोटो ट्विट केला नसता असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT