भाजीवाल्यांकडून पैसे घेतानाचा Video व्हायरल, माजी नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल
मिथिलेश गुप्ता, डोंबिवली: आठवडी बाजारात फेरीवाल्यांकडून हप्ता उकळल्याप्रकरणी फेरीवाल्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मानपाडा पोलीस ठाण्यात संजय सिंग, नरेश, रोहन, मामा यांच्यासह माजी नगरसेवक कुणाल पाटील अशा पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी व्हीडिओत पैसे घेताना दिसत असलेल्या संजय सिंग याला अटक करत पुढील तपास सुरू केला आहे. याबाबत माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी आरोपांच खंडन […]
ADVERTISEMENT

मिथिलेश गुप्ता, डोंबिवली: आठवडी बाजारात फेरीवाल्यांकडून हप्ता उकळल्याप्रकरणी फेरीवाल्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मानपाडा पोलीस ठाण्यात संजय सिंग, नरेश, रोहन, मामा यांच्यासह माजी नगरसेवक कुणाल पाटील अशा पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी व्हीडिओत पैसे घेताना दिसत असलेल्या संजय सिंग याला अटक करत पुढील तपास सुरू केला आहे.
याबाबत माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी आरोपांच खंडन करत बदनाम करण्यासाठी राजकीय षड्यंत्र आहे या संपूर्ण प्रकाराची पोलिसांनी शहानिशा करावी असे सांगितले. एकीकडे कोरोना काळात आठवडी बाजारांना बंदी घालण्यात आली असली तरी काही ठिकाणी हे बाजार बिनदिक्कत सुरू आहेत. या आठवडी बाजारांना राजकीय व प्रशासकीय वरदहस्त असल्याची चर्चा या प्रकारामुळे रंगली आहे.
नेमकं प्रकरण काय?
कल्याण पूर्व भागातील आडिवली परिसरात आठवडी बाजार भरवला जातो. कोव्हिडच्या काळात आठवडी बाजार बंद असताना या परिसरात मोठ्या प्रमाणात फेरीवाले बसतात. या फेरीवाल्यांना धंदा लावण्यासाठी हप्ता वसूल केली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याचा व्हीडिओसुद्धा समोर आला आहे.