बुलढाणा : सोयाबीन आणि कापसाच्या दरासाठी रविकांत तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन
– ज़का खान, बुलढाणा प्रतिनिधी सोयाबीनला प्रति क्विंटल ८ हजार आणि कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपयांचा दर निश्चीत करुन धोरण आखावं या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे. आपल्या अन्नत्याग आंदोलनात तुपकर यांनी पाम तेलावरचा आयात कर पूर्वीप्रमाणे 30 टक्के करण्यात यावा, सोयाबीनवर लागू असलेला जीएसटी हटवण्यात […]
ADVERTISEMENT

– ज़का खान, बुलढाणा प्रतिनिधी
सोयाबीनला प्रति क्विंटल ८ हजार आणि कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपयांचा दर निश्चीत करुन धोरण आखावं या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे. आपल्या अन्नत्याग आंदोलनात तुपकर यांनी पाम तेलावरचा आयात कर पूर्वीप्रमाणे 30 टक्के करण्यात यावा, सोयाबीनवर लागू असलेला जीएसटी हटवण्यात यावा या मागण्याही केल्या आहेत.
बुधवारपासून तुपकर यांनी नागपुरात या आंदोलनाला सुरुवात केली. परंतु नागपूर पोलिसांनी तुपकरांचे आंदोलन मोडीत काढण्यासाठी तुपकरांना रात्री साडे दहा वाजता ताब्यात घेऊन त्यांच्या बुलडाण्याच्या निवासस्थानी सोडले.
परंतू आंदोलनाच्या मागणीवर ठाम असलेल्या रविकांत तुपकरांनीही माघार घ्यायची नाही असा निश्चय केला आहे. जिथे पोलीस सोडतील तिथेच अन्नत्याग सत्याग्रह करू, त्यानुसार आता तुपकरांनी आपल्याच घरासमोर अन्नत्याग सत्याग्रह सुरू केला आहे.