रवींद्र धंगेकर: ‘This is Dhangekar..’, विधानसभेत मविआने भाजपच्या जखमेवर चोळलं मीठं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Ravindra Dhangekar Oath on Vidhan Sabha : कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूकीत कॉंग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) विजयी झाले होते. तर पिंपरी चिंचवडमधून अश्विनी जगताप विजयी झाल्या होत्या. या विजयानंतर आता आज विधानसभेत दोन्ही आमदारांचा शपथविधी पार पडला. यावेळी रवींद्र धंगेरकरांच्या शपथविधी दरम्यान महाविकास आघाडीने विधानसभेत जोरदार घोषणाबाजी केली. तसेच ‘This is Dhangekar’च्या घोषणाबाजी देऊन विधानसभा दणाणून सोडत भाजपला डिवचल होतं.(ravindra dhangekar oath ceremony Mahavikas Aghadi slogans this is dhangekar criticized bjp)

Maharashtra Budget: ‘मविआ’चा प्लान ठरला! बजेट आधीच घेतला मोठा निर्णय

विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी शपथविधीसाठी सर्वप्रथम पिंपरी चिंचवड पोटनिवडणूकीतील विजयी आमदार अश्विनी जगताप यांच्या नावाची घोषणाबाजी केली होती.यानंतर शपथविधासाठी कसबा पोटनिवडणूकीचे महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यावेळी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानसभेत जोरदार घोषणाबाजी केली. मविआच्या आमदारांनी ‘महाविकास आघाडीचा विजय असो’ अशी घोषणाबाजी केली. तसेच ‘This is Dhangekar’अशा घोषणाबाजी करून भाजपला प्रत्युत्तर दिले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘आमदार-खासदारांना खोके मिळतात, पण शेतकऱ्यांना…’, ठाकरेंचं शिंदेंच्या वर्मावर बोट

भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारा दरम्यान पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘Who is Dhangekar’असा सवाल केला होता. त्यामुळे ‘Who is Dhangekar’भाजपची एकप्रकाराची घोषणाबाजी ठरली होती. आणि ती खुप चर्चेत आली होती. त्यानंतर पोटनिवडणूकीत रवींद्र धंगेरकरांनी (Ravindra Dhangekar) भाजपच्या हेमंत रासनेचा पराभव केला होता. हा पराभव करून धंगेकरांनी भाजपचा बालेकिल्ला हिसकावला होता.

ADVERTISEMENT

VIDEO: ..अन् चक्क नारायण राणेंनी हात जोडले, असं घडलं तरी काय?

ADVERTISEMENT

रविंद्र धंगेकर यांनी शपथविधीच्या सुरूवातीला कसबा विधानसभेतील मतदारांना नमस्कार केला.त्यानंतर त्यांनी शपथ घेताना आपल्या नावात आईचा उल्लेख केला. मी रविंद्र लक्ष्मीबाई ऊर्फ सुलोचना हेमराज धंगेकर असे म्हणत त्यांनी आपल्या शपथविधीला सुरूवात केली होती. या शपथ विधीनंतर महाविकास आघाडीच्या आमदारांनी ‘This is Dhangekar’च्या घोषणा दिल्या. या घोषणे मविआ आमदारांनी भाजपाला घेरण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान कसबा विधानसभा पोटनिवडणूकीत रवींद्र धंगेकर यांनी तब्बल ११ हजार ०४० मतांनी हेमंत रासने यांचा पराभव केला आहे. हा पराभव करून त्यांनी भाजपला चांगलाच घाम फोडला होता. विधानसभेत आता भाजपच्या ‘Who is Dhangekar’ या घोषणाबाजी पेक्षा ‘This is Dhangekar’ही महाविकास आघाडीची घोषणाबाजी चर्चेत आली आहे. मविआने ‘This is Dhangekar’ही घोषणाबाजी करून विधानसभा दणाणून सोडली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT