gujarat election : रविंद्र जाडेजा बाळासाहेब ठाकरेंचा व्हिडीओ ट्विट करत म्हणाला, अभी टाइम है गुजरातीयों’
बाळासाहेब ठाकरेंच्या ज्या विधानावरून ठाकरेंकडून सातत्यानं मोदी आणि भाजपवर टीका करण्यात येते, तोच मुद्दा गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पोहोचला आहे. क्रिकेटपटू रविंद्र जाडेजाने बाळासाहेब ठाकरेंचा व्हिडीओ ट्विट केलाय. ‘अभी टाइम है गुजरातीयों’ म्हणत त्याने भाजपला मतदान करण्याचं आवाहन केलंय. गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. आज पहिल्या टप्प्यातील 89 जागांसाठी मतदान होत असून, मतदानादरम्यान क्रिकेटपटू रविंद्र […]
ADVERTISEMENT

बाळासाहेब ठाकरेंच्या ज्या विधानावरून ठाकरेंकडून सातत्यानं मोदी आणि भाजपवर टीका करण्यात येते, तोच मुद्दा गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पोहोचला आहे. क्रिकेटपटू रविंद्र जाडेजाने बाळासाहेब ठाकरेंचा व्हिडीओ ट्विट केलाय. ‘अभी टाइम है गुजरातीयों’ म्हणत त्याने भाजपला मतदान करण्याचं आवाहन केलंय.
गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. आज पहिल्या टप्प्यातील 89 जागांसाठी मतदान होत असून, मतदानादरम्यान क्रिकेटपटू रविंद्र जाडेजाने एक व्हिडीओ ट्विट केलाय. बाळासाहेब ठाकरे भाषण करतानाचा हा व्हिडीओ आहे. हा जुना व्हिडीओ ट्विट करत जाडेजाने गुजरातमधील मतदारांना भाजपला मतदान करण्याचं आवाहन केलंय.
‘मोदी गया तो गुजरात गया’
रविंद्र जाडेजाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये बाळासाहेब ठाकरे म्हणताहेत की, माझं म्हणणं इतकंच आहे की, नरेंद्र मोदी गया, गुजरात गया. नरेंद्र मोदीला तुम्ही बाजूला केलं, तर गुजरात गेला हे माझं वाक्य मी आडवाणीपाशी बोललेलो आहे,” असं या व्हिडीओ बाळासाहेब ठाकरे म्हणत आहेत.
मोदी-शहांच्या राज्यात ते शक्य आहे काय? ठाकरेंचा सवाल, कायदामंत्र्यांच्या राजीनाम्याची केली मागणी