कर्नाटकचा ‘पुष्पा’ सांगलीत पकडला ! तब्बल २ कोटी ४५ लाखांचे रक्तचंदन जप्त

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

स्वाती चिखलीकर, प्रतिनिधी, सांगली

सगळ्या यंत्रणांना चकवा देत मोठ्या प्रमाणात लाल चंदनाची म्हणजेच रक्तचंदनाची तस्करी केला जाणारा पुष्पा चित्रपट सध्या चर्चेत आहे. याचीच प्रचिती येत आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या दोन राज्यातील यंत्रणेला चकवा देत महाराष्ट्रात तस्करी होत असलेल्या 2 कोटी 45 लाख 85 हजाराचे 983 किलो 400 ग्रॅम रक्तचंदनावर मिरजेत पोलीस आणि वन विभागाने धाड टाकून पकडले. यावेळी यासिन इनायतउल्ला (रा. अनेकळ, जि. बंगलुरु) याला ताब्यात घेण्यात आले.

आंध्रप्रदेशमधल्या जंगलातून मोठ्या प्रमाणात चंदनाची तस्करी कशी केली जाते यावर प्रकाश टाकणारा चित्रपट पुष्पा नुकताच प्रदर्शित झाला होता. याची मोठी चर्चा सर्वत्र होती. अशाच प्रकारे रक्तचंदन महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, उपाधिक्षक अशोक विरकर आणि सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या पथकाने वन विभागाच्या साह्याने चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी रविवारी पहाटे तस्करी होत असलेले रक्तचंदन मिरजेतून जाणार असल्याची माहिती रविराज फडणीस यांना मिळाली

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

फडणीस यांनी मिरज – कोल्हापूर रस्त्यावर पहाटेच्या सुमारास सापळा लावला. यावेळी फळ वाहतूक होत असल्याचा फलक लावून जाणारा KA 13 6900 हा टेम्पो पोलिसांना आढळून आला. त्याची तपासणी केली असता त्यामध्ये 2 कोटी 85 लाखाचे 983 किलो 400 ग्रॅम चंदन असल्याचे निदर्शनास आले. ते जप्त करण्यात आले असून हे रक्तचंदन नेमके आले कुठून याचा तपास सांगली पोलीस करीत आहेत.

सांगली जिल्ह्यातील मिरज येथे अडीच कोटीचे रक्त चंदन पोलिसानी जप्त केले आहे. एक टन रक्त चंदन बेंगलोर हुन कोल्हापूरला नेहले जात होते, महात्मा गांधी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. या प्रकरणी यासीन इनायत उल्ला खान यास अटक करण्यात आली आहे. एक गाडी आणि रक्तचंदन सहित अडीच कोटींचा मुद्दे माल जप्त केला आहे, या कारवाईमुळे आंतरराज्य टोळी उघडकीस आली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT