धनंजय मुंडेंना 5 कोटींसाठी ब्लॅकमेल करणाऱ्या रेणू शर्माला दोन दिवसांची पोलीस कोठडी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

धनंजय मुंडे यांना ५ कोटींसाठी ब्लॅकमेल करणाऱ्या रेणू शर्माला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर रेणू शर्माला अटक करण्यात आली. त्यानंतर तिला कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने तिला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री धनंयज मुंडे यांनी एका महिलेच्या विरोधात मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ही महिला परिचयाची असून तिने पाच कोटी रूपयांची खंडणी आणि दुकान नावावर करा अशी मागणी केली होती. तुम्ही असं केलं नाही तर बलात्काराची तक्रार सोशल मीडियावर करून तुमचं मंत्रिपद घालवेन अशी धमकी देण्यात आल्याचंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं होतं. ही महिला दुसरीतिसरी कुणीही नसून रेणू शर्मा आहे. तिला पोलिसांनी अटक केली आहे.

‘५ कोटींची रक्कम द्या, नाहीतर….’ ; धनंजय मुंडेंना ब्लॅकमेल करणाऱ्या रेणू शर्माला अटक

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कोण आहे रेणू शर्मा? आणि काय आहे प्रकरण?

रेणू शर्माने जानेवारी २०२१ मध्ये धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केले होते. धनंजय मुंडे यांच्याविरोधात रेणू शर्मा या महिलेने पोलीस आणि कोर्टात धाव घेतल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. विरोधी पक्षांनी धनंजय मुंडे यांच्यावर कारवाईची मागणी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचा राजीनामा घेणार अशाही चर्चांना सुरुवात झाली होती. परंतू काही दिवसांनी रेणू शर्माने धनंजय मुंडे यांच्याविरोधातली तक्रार मागे घेतली.

ADVERTISEMENT

रेणू शर्मा ही महिला मूळ इंदोर मध्य प्रदेशातील असून ती करुणा शर्माची बहीण आहे. धनंजय मुंडे यांच्या तक्रारीनंतर मुंबई क्राईम ब्रांच आणि इंदूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तिला अटक करून आधी इंदूर कोर्टात हजर केलं, इंदूर कोर्टानं तिचा ताबा दिला आणि त्यानंतर आज सदर महिलेला पुढील चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. दरम्यान, सदर रेणू शर्मावर इतर अनेक व्यक्तींनीही ब्लॅकमेलिंग संदर्भातील तक्रारी यापूर्वी अनेकदा विविध पोलीस ठाण्यात दाखल केल्या आहेत.

ADVERTISEMENT

तक्रारीत काय म्हटलं आहे?

मागच्या वर्षी एक कागद पोलिसात दिला तर तुमचं मंत्रिपद धोक्यात आलं होतं. आता पुन्हा तिच माझ्यावर बलात्कार झाला असल्याची तक्रार सोशल मीडियावरून करत बदनामी करून तुमचं मंत्रिपद घालवीन. असं होऊ द्यायचं नसेल तर ५ कोटींची रक्कम आणि ५ कोटींचं दुकान घेऊन द्या. अशी मागणी आपल्याकडे रेणू शर्माने केल्याचं धनंजय मुंडे यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी मुंबई गुन्हे शाखेत धाव घेत तिच्याविरोधात ब्लॅकमेल करत असल्याची पुराव्यांसह तक्रार दिली आहे. रेणू शर्मा या महिलेने मागच्या वर्षी जानेवारी महिन्यात धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्कार केल्याचा आरो करत खळबळ माजवली होती.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT