सोलापूर : सिद्धरामेश्वर यात्रेवर निर्बंध, फक्त ५० भाविकांनाच परवानगी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता, सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेवर निर्बंध घालण्यात आले आहेत.यात्रेसाठी फक्त ५० लोकांनाच उपस्थित राहता येणार आहे. सोलापूर महापालिका आयुक्तांनी याबद्दलचे निर्णय जारी केले आहेत.

श्री सिद्धेश्वर रामेश्वर महाराज हे सोलापूरचे ग्रामदैवत आहे. त्याबरोबरच सोलापूर परिसरासह पंचक्रोशीतील भाविकांचं हे श्रध्दास्थान मानलं जातं. दरवर्षी श्री सिध्दरामेश्वरांची मोठी यात्रा सोलापुरात भरते. यंदा १२ ते १६ जानेवारीदरम्यान ही यात्रा होणार आहे. परंतु, सध्या कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. याच कारणासाठी यात्रेवर प्रशासनाकडून निर्बंध घालण्यात आले आहेत.

Covid 19: महाराष्ट्रात पुन्हा मंदिरं होऊ लागली बंद, मांढरदेवीच्या काळूबाईची यात्राही रद्द

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या महामारीमुळे ही यात्रा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमानुसार करण्यात आली. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून फक्त ५० लोकांच्या उपस्थितीत ही यात्रा पार पडणार आहे. या ५० लोकांमध्ये १५ पुजारी आणि इतर ३५ लोकांचा समावेश असणार आहे. या ५० लोकांची यादी दोन दिवस आधी मंदिर समितीकडून सोलापूर प्रशासनाला सादर करावी लागणार आहे. प्रशासनाने परवानगी दिल्यानंतरच या ५० लोकांना यात्रेतील विविध विधींना हजर राहता येणार आहे. त्याबरोबरच यात्रेतील विधी करत असताना सुरक्षित अंतराचे पालन करूनच हे विधी करण्यात यावेत, असे प्रशासनाने जाहीर केलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

कोरोना रूग्ण वाढल्याने तुळजाभवानी देवीचा शाकंभरी नवरात्र महोत्सव साधेपणाने साजरा होणार

ADVERTISEMENT

यात्रेत दरवर्षी तैलाभिषेकासाठी सात नंदीध्वजाची पायी मिरवणूक काढण्यात येते. परंतु यंदा या मिरवणुकीला परनानगी देण्यात आली नाही. नंदीध्वज वाहनातून नेले जाणार आहेत. त्याबरोबरच संमती कट्ट्यावरील विवाह सोहळ्याला फक्त ५० जणांनाच उपस्थित राहण्याची परवानगी मिळाली आहे. परंतू यासाठी लसीचे दोन्ही डोस घेणं बंधनकारक करण्यात आलंय. याचसोबत शोभेच्या दारूकामासह सुगडी पूजनाला परवानगी नाकारण्यात आली आहे. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करूनच यात्रा पार पाडावी लागणार आहे असे आदेश सोलापूर महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT