भाडे दिले नाही म्हणून रिक्षाचालकाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पुण्यातली खळबळजनक घटना
पुण्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना समोर आली आहे. पुणे शहरातील रेसकोर्स भागात एका रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. रिक्षाभाडे दिलं नाही त्यामुळे या रिक्षाचालकाने मुलीला रेसकोर्स भागातल्या झाडीमध्ये नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत रिक्षाचालकासह तिघांना अटक केली आहे. सागर बचुटे (वय-24), विकी कुमार फुलो पासवान (वय-23) आणि अशोक […]
ADVERTISEMENT

पुण्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना समोर आली आहे. पुणे शहरातील रेसकोर्स भागात एका रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. रिक्षाभाडे दिलं नाही त्यामुळे या रिक्षाचालकाने मुलीला रेसकोर्स भागातल्या झाडीमध्ये नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला.
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत रिक्षाचालकासह तिघांना अटक केली आहे. सागर बचुटे (वय-24), विकी कुमार फुलो पासवान (वय-23) आणि अशोक वीर बहादुर थापा (वय-23) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. या प्रकरणी एका 16 वर्षीय मुलीने तक्रार दिली आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात आणि 5 जानेवारीला हा प्रकार घडला. या दोन्ही वेळी या पीडितेवर बलात्कार कऱण्यात आला.
डिसेंबर 2021 च्या दुसऱ्या आठवड्यात फिर्यादी फुरसुंगी परिसरात राहताना ओळखीच्या असलेल्या इतर आरोपींनी फिर्यादी आणि तिच्या मैत्रिणीसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करून त्यांची छेड काढली. या प्रकरणी बलात्कार आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.