Rishabh Pant: मुंबईतील रूग्णालयात 3 तासांच्या सर्जरीनंतर, कशी आहे तब्येत?

भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतला उपचारासाठी मुंबईतील कोकिलाबेन रूग्णालयात आणले. याठिकाणी ऋषभवर एक यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
Rishabh Pant Latest Health Update
Rishabh Pant Latest Health Update

Indian Cricketer Rishabh Pant: भारतीय क्रिकेटर ऋषभ पंत (Rishabh Pant) झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाला होता. सुरुवातीला त्याच्यावर देहरादूनमधील मॅक्स रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आता पुढील उपचारासाठी त्याला मुंबईतील (Mumbai) कोकिलाबेन धीरूभाई अंबानी (Kokilaben Dhirubhai Ambani Hospital) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विमानाने उड्डाण करण्याच्या स्थितीत पंत नसल्यामुळे त्याला देहरादूनहून (Dehradun) एअर अॅम्ब्युलन्सने आणण्यात आले. याठिकाणी ऋषभवर एक यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शस्त्रक्रियेनंतर, त्याच्या तब्येतीबाबत एक हेल्थ अपडेट जारी करण्यात आले आहे. सध्या तो डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे आणि तो उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहे. (Rishabh Pants successful surgery in kokilaben hospital health update)

ऋषभ पंतची करण्यात आलेली शस्त्रक्रिया ही उजव्या पायाच्या गुडघ्याच्या लिगामेंटची आहे. ती यशस्वीरित्या करण्यात आली. मुंबईच्या अंधेरी पश्चिम येथील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रूग्णालयातील स्पोर्ट्स मेडीसिन सेंटरचे प्रमुख आणि आर्थ्रोस्कोपी आणि शोल्डर सर्व्हिसचे संचालक डॉ. परडीवाला यांच्या देखरेखीखाली ही शस्त्रक्रिया करण्यात आली.

Rishabh Pant Latest Health Update
Yogesh Kadam: 'हा अपघात नव्हता, माझ्या..', रामदास कदमांच्या मुलाचा आरोप

मुंबईतील रूग्णालयात पंतच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया तीन तास चालली...

कार अपघातात ऋषभच्या डोक्याला, पाठीला, पायाला, गुडघ्याला आणि घोट्याला गंभीर दुखापत झाली आहे. डॉ. दिनशॉ परडीवाला यांनी ऋषभची शस्त्रक्रिया केली. ती जवळजवळ तीन तास चालली, यानंतर आता ऋषभला जवळपास 3 ते 4 दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.

देहरादूनहून मुंबईला एअरलिफ्टद्वारे आणले, बीसीसीआयने केले नियोजन!

देहरादूनमध्येही ऋषभ पंतच्या चेहऱ्यावर आणि इतर काही ठिकाणी छोट्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. परंतु, पुढील उपचारासाठी मुंबईला नेण्याचा निर्णय बीसीसीआयने तातडीने घेतला. अपघातामुळे पंत विमानाने उड्डाण करण्याच्या स्थितीत नव्हता, यामुळे त्याला देहरादूनहून एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईला उपचारासाठी आणण्यात आले.

कसा झाला अपघात?

भारताचा स्टार यष्टीरक्षक ऋषभ पंतची मर्सिडीज कार ही दिल्ली-देहरादून महामार्गावरील रस्ता दुभाजकावर आदळली, त्यानंतर कारला आग लागली. त्यावेळी पंत कसा तरी कारमधून बाहेर पडण्यात यशस्वी झाला. अपघातात त्याला जबर मार लागला. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत आणि त्यांच्या तब्येतीबाबत रोज नवनवीन हेल्थ अपडेट डॉक्टरांकडून देण्यात येत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in