रोहित पवार म्हणतात, आता ‘यावर’ कुणीही राजकारण करु नये!
अहमदनगर: ‘सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने एकत्र बसून मराठा समाजातील तरुणांना कशाप्रकारे मदत करता येईल याचा विचार करावा. यावर कुणीही राजकारण करु नये.’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी दिली आहे. मराठा आरक्षण (Maratha Reservation) सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) रद्द केल्यानंतर त्यावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येणं सुरुच आहे. अशाच वेळी […]
ADVERTISEMENT

अहमदनगर: ‘सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने एकत्र बसून मराठा समाजातील तरुणांना कशाप्रकारे मदत करता येईल याचा विचार करावा. यावर कुणीही राजकारण करु नये.’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी दिली आहे. मराठा आरक्षण (Maratha Reservation) सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) रद्द केल्यानंतर त्यावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येणं सुरुच आहे. अशाच वेळी रोहित पवार यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. जाणून घ्या आमदार रोहित पवार यांनी नेमकं काय-काय म्हटलं आहे.
‘सर्वांना अपेक्षित निकाल आला असता तर…’
‘सुप्रीम कोर्टाने निकाल दिला तो कसा दिला याचा मी फार अभ्यास केलेला नाही. पण जे कळतं आहे ते असं की, 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण द्यायला सुप्रीम कोर्टाने नाकार दिला आहे. हा निकाल ऐकल्यानंतर माझ्यासारख्या असंख्य लोकांना वाईट वाटतंय. आरक्षण मिळालं असतं तर फायदा झाला असता. पण शेवटी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. मी एकच विनंती करतो की सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्षातील नेते सर्वांनी एकत्र बसून या समाजात असलेल्या युवा वर्गाला मदत करण्याची गरज आहे. त्यात राजकारण कोणीही करू नये. याबाबत विचार करण्याची गरज आहे.’
‘या खटल्यासाठी जे वकील आधीच्या सरकार दिले होते तेच वकील आपणही कायम ठेवले होते. युक्तीवाद योग्य पद्धतीने झालेला आपण सर्वांनी पाहिला. शेवटी सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा सुप्रीम कोर्टाचा असतो. पण तो जर दुसऱ्या बाजूने झाला असता तर ज्याची आपण सर्वजण अपेक्षा करत होतो तर चांगली गोष्ट झाली असती. पण आता सरकार म्हणून आपल्या हातात ज्या गोष्टी आहेत मला असे वाटते की, सरकारने व विरोध पक्षाने एकत्र बसून समाजातील युवा वर्गाला जी काही मदत करता येईल ती करावी यात कुठेही राजकारण करण्यात येऊ नये.’ अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे.