सचिन वाझेंवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विधानसभेत खडाजंगी
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या कारचा मुद्दा आज विधानसभेत चर्चेला आला.या प्रकरणात सर्वात आधी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही प्रश्न उपस्थित केले. स्कॉर्पिओ कार जेव्हा अँटेलियाबाहेर सापडली तेव्हा सर्वात आधी तिथे सचिन वाझे कसे पोहचले? स्कॉर्पिओ प्रकरणाचा तपास सचिन वाझेंकडेच का देण्यात आला? स्कॉर्पिओचा मालक क्रॉफर्ड मार्केटमध्ये कुणाला भेटला होता? हे आणि असे […]
ADVERTISEMENT

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या कारचा मुद्दा आज विधानसभेत चर्चेला आला.या प्रकरणात सर्वात आधी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही प्रश्न उपस्थित केले. स्कॉर्पिओ कार जेव्हा अँटेलियाबाहेर सापडली तेव्हा सर्वात आधी तिथे सचिन वाझे कसे पोहचले? स्कॉर्पिओ प्रकरणाचा तपास सचिन वाझेंकडेच का देण्यात आला? स्कॉर्पिओचा मालक क्रॉफर्ड मार्केटमध्ये कुणाला भेटला होता? हे आणि असे प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केले. ज्यानंतर दोन तासातच स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीत सापडल्याची बातमी समोर आली. या प्रकरणात अनेक योगायोग कसे ? असाही प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.
फडणवीसांनी आरोप केलेले सचिन वाझे आहेत तरी कोण?
सचिन वाझेंवरून खडाजंगी
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाची चर्चा जेव्हा सभागृहात सुरू झाली तेव्हा सचिन वाझेंवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी पाहण्यास मिळाली. सचिन वाझे यांनी अर्णब गोस्वामीवर कारवाई केली म्हणून विरोधकांचा त्यांच्यावर राग आहे का? असा प्रश्न राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विचारला. तसंच परिवहन मंत्री अनिल परब यांनीही विरोधी पक्षनेत्यांचा पोलिसांवर विश्वास नाही का? लगेच प्रकरणाचा तपास NIA कडे देण्याची मागणी का होते आहे असा प्रश्न विचारला. तुम्ही पोलिसांवर अविश्वास का दाखवत आहात. तुम्ही मुख्यमंत्री असताना तुम्हीच पोलिसांचं किती कौतुक केलं आहे. आता त्यांच्यावर संशय का घेत आहात? असाही प्रश्न परब यांनी विचारला