Shiv Sena vs BJP: ‘…तर संघर्षाचा भडका उडेल, मोदींना तेच हवे आहे’; शिवसेनेची तुफान टीका
मुंबई: ‘विकत घेतलेले बहुमत म्हणजे सुशासन नाही. देश राम भरोसे व भोंगे भरोसे चालला आहे. दुसरीकडे पंतप्रधान मोदी महागाईचे खापर हे राज्यावर फोडतात. अशाने केंद्र व राज्यांतील संघर्षाचा भडका उडेल. मोदींना तेच हवे आहे!’ अशी घणाघाती टीका शिवसेनेने आपल्या मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून केलं आहे. महागाई, पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि कोरोना या तीन मुद्द्यांवर अग्रलेखातून पंतप्रधान […]
ADVERTISEMENT

मुंबई: ‘विकत घेतलेले बहुमत म्हणजे सुशासन नाही. देश राम भरोसे व भोंगे भरोसे चालला आहे. दुसरीकडे पंतप्रधान मोदी महागाईचे खापर हे राज्यावर फोडतात. अशाने केंद्र व राज्यांतील संघर्षाचा भडका उडेल. मोदींना तेच हवे आहे!’ अशी घणाघाती टीका शिवसेनेने आपल्या मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून केलं आहे.
महागाई, पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि कोरोना या तीन मुद्द्यांवर अग्रलेखातून पंतप्रधान मोदींवर तुफान टीका करण्यात आली आहे.
सामनाच्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे:
-
केंद्राचे सरकार सर्वच पातळय़ांवर अपयशी ठरत आहे. विकत घेतलेले बहुमत म्हणजे सुशासन नाही. देश राम भरोसे व भोंगे भरोसे चालला आहे. महागाई, कोरोना, बेरोजगारीवरून लक्ष उडविण्यासाठी पंतप्रधान वादग्रस्त विषयांना फोडणी देत आहेत. हे लक्षण बरे नाही. तुम्ही महाराष्ट्रासारख्या राज्यावर महागाईचे खापर फोडता, मग केंद्र सरकार काय करते? हा प्रश्न उरतोच.