सचिन वाझेंकडून अँटेलिया बाहेर रेकी?? NIA च्या अधिकाऱ्यांना संशय
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणात NIA ने मुंबई पोलीस दलात काम करणारे अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली. यानंतरच्या तपासातून अनेक महत्वाच्या गोष्टी समोर येत आहेत. सचिन वाझे यांनी अंबानी यांच्या अँटेलिया घराबाहेर स्कॉर्पिओ गाडी ठेवल्याची माहिती NIA मधील सूत्रांनी दिली. ही गाडी ठेवण्याआधी सचिन वाझे यांनी रेकी केल्याचंही आता समोर येतंय. […]
ADVERTISEMENT

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणात NIA ने मुंबई पोलीस दलात काम करणारे अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली. यानंतरच्या तपासातून अनेक महत्वाच्या गोष्टी समोर येत आहेत. सचिन वाझे यांनी अंबानी यांच्या अँटेलिया घराबाहेर स्कॉर्पिओ गाडी ठेवल्याची माहिती NIA मधील सूत्रांनी दिली. ही गाडी ठेवण्याआधी सचिन वाझे यांनी रेकी केल्याचंही आता समोर येतंय.
मुंबई पोलिसांमधील नाराजी चव्हाट्यावर ! उद्धव ठाकरेंवर नाराज असलेले संजय पांडे सुट्टीवर
NIA मधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन वाझे यांना अंबानी यांच्या घराबाहेरील BMC च्या पार्किंग स्पेसमध्ये ही कार पार्क करायची होती. ही गाडी पार्क करण्यासाठी वाझे आणि त्यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्याने या भागाची रेकीही केल्याचा NIA ला संशय आहे. सचिन वाझे या पार्किंग स्पेसमध्ये गेले आणि १५ मिनीटांसाठी त्यांनी ही गाडी पार्क केली. पार्किंगचे पैसेही न देता सचिन वाझे आणि त्यांचे सहकारी तिकडून बाहेर पडले. पण वाझे यांनी यानंतरही ही कार त्याच भागात पार्क का करुन ठेवली नाही याचा तपास आता NIA करत आहे. पार्कींग लॉटचं सीसीटीव्ही फुटेजही NIA चे अधिकारी तपासत आहेत.
दरम्यान या प्रकरणात मुंबई पोलीस दलातील आणखी काही वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. NIA च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चौकशीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले जाणार नसून त्यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घेण्याचा NIA प्रयत्न करणार आहे. सचिन वाझे हे मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांच युनिटमध्ये CIU विभागात काम करत होते. नियमानुसार वाझे यांनी DCP किंवा Joint CP (Crime) यांना रिपोर्टींग करणं गरजेचं होतं. पण सचिन वाझे हे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना रिपोर्ट करायचे. त्यामुळे सचिन वाझे यांच्या कामाची शैली कशी होती हे जाणून घेण्याचा प्रयत्न NIA करणार आहे.










