‘राहुल गांधींना देशाबाहेर फेकून दिलं पाहिजे’, साध्वी प्रज्ञा का भडकल्या?
Sadhvi pragya News: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याबद्दल मध्य प्रदेशातील भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी मोठं विधान केलं आहे. राहुल गांधींनी ब्रिटनमध्ये मांडलेल्या भूमिकेवर टीका करताना साध्वी प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या की, “परदेशी महिलेच्या पोटी जन्माला आलेला मुलगा देशभक्त होऊ शकत नाही. राहुल गांधींनी हे सिद्ध केलं आहे. राहुल गांधी परदेशात म्हणतात की, त्यांना संसदेत […]
ADVERTISEMENT

Sadhvi pragya News: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याबद्दल मध्य प्रदेशातील भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी मोठं विधान केलं आहे. राहुल गांधींनी ब्रिटनमध्ये मांडलेल्या भूमिकेवर टीका करताना साध्वी प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या की, “परदेशी महिलेच्या पोटी जन्माला आलेला मुलगा देशभक्त होऊ शकत नाही. राहुल गांधींनी हे सिद्ध केलं आहे. राहुल गांधी परदेशात म्हणतात की, त्यांना संसदेत बोलू दिलं जात नाही. या पेक्षा लज्जास्पद बाब कोणतीही नाही. राहुल गांधींना देशातून बाहेर फेकून दिलं पाहिजे”, अशी टीका साध्वी प्रज्ञा यांनी केली आहे.
साध्वी प्रज्ञा शनिवारी भोपाळ-दाहोद रेल्वेला हिरवी झेंडी दाखवण्यासाठी आल्या होत्या. संत हिरदाराम नगर (बैरागड) रेल्वे स्टेशनवर पाच रेल्वे गाड्यांना थांबा देण्यास सुरूवात झाली. याप्रसंगी बोलताना साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.
साध्वी प्रज्ञा ठाकूर राहुल गांधींच्या विधानावर काय म्हणाल्या?
खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या, “संसदेत चांगल्या प्रकारे कामकाज होत आहे. सर्वकाही चांगलं आहे, पण काही काँग्रेसचे लोक सरकार चालू देत नाहीयेत. संसदे चालू देत नाहीये. अधिवेशन चाललं तर अधिक काम होईल आणि जास्त काम झालं, तर त्यांचं अस्तित्वच नष्ट होईल, म्हणून त्यांचा प्रयत्न असतो की, संसदेत जास्त काम होऊ नये.”
RSS मुस्लिम ब्रदरहूडसारखी कट्टरपंथी संघटना, राहुल गांधींचा पुन्हा हल्ला
“त्यांचं अस्तित्व संपण्याच्या टोकावर आहे. त्यांची बुद्धी भ्रष्ट होत चालली आहे. तुम्ही (राहुल गांधी) आपल्या देशाचे नेते आहात. तुम्हाला जनतेनं निवडून दिलं आहे आणि तुम्ही जनतेचा आणि देशाचा अपमान करत आहात”, अशी टीका साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी केली.
Pragya Thakur: “हे चाणक्यने म्हटलेलं आहे की,…”
“तुम्ही भारताचे नाही आहात, असं आम्ही समजून घेतलं आहे, कारण तुमची आई इटलीची आहे. हे आम्ही म्हणत नाहीये, तर चाणक्यने म्हटलेलं आहे की, परदेशी महिलेच्या पोटी जन्माला आलेला पुत्र कधीच देशभक्त होऊ शकत नाही. राहुल गांधींनी हे सिद्ध केलं आहे. कारण भारताच्या संसदेनं आणि जनतेनं निवडून दिलं आहे. इतकी वर्ष काँग्रेसचं सरकार होतं, तुम्ही देशाला पोखरून ठेवलं आहे”, असं साध्वी प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या.
Muslim Brotherhood : राहुल गांधींनी RSS ची तुलना केलेली मुस्लिम ब्रदरहूड काय आहे?
Rahul Gandhi : “संसदेत माईक बंद केले जातात”
अलिकडेच राहुल गांधींनी लंडनमधील हाऊस ऑफ पार्लमेंटमध्ये ब्रिटनच्या खासदारांशी चर्चा केली. त्यावेळी राहुल गांधी मायक्रोफोनद्वारे बोलत होते. तो खराब झाला. त्यावेळी ते असं म्हणाले होते की, “माईक खराब नाहीये, तो सुरू आहे पण तरीही तुम्ही तो चालू करू शकत नाही. कारण जेव्हा मी संसदेत माझी भूमिका मांडतो, तेव्हा अनेकदा असं झालं आहे.”