‘अंधभक्तांनो, हे कधी थांबणार?’, संजय राऊतांचा थेट मोदी-शाहांवर प्रहार
Sanjay Raut RokhThok । PM Narendra Modi । Union Home Minister Amit Shah : “तुम्ही देशाचे राज्यकर्ते आहात व सध्या ‘बादशाही’ पद्धतीने राज्य करत आहात. कश्मीर व पंजाबातील घटनांपासून तुम्हाला पळ काढता येणार नाही. दोन्ही सीमावर्ती राज्ये आता स्फोटक स्थितीतून जात आहेत. कधीही आग लागेल अशी स्थिती असताना दिल्लीचे ‘निरो’ फक्त देशभक्तीची बासरी वाजवीत आहेत”, […]
ADVERTISEMENT

Sanjay Raut RokhThok । PM Narendra Modi । Union Home Minister Amit Shah : “तुम्ही देशाचे राज्यकर्ते आहात व सध्या ‘बादशाही’ पद्धतीने राज्य करत आहात. कश्मीर व पंजाबातील घटनांपासून तुम्हाला पळ काढता येणार नाही. दोन्ही सीमावर्ती राज्ये आता स्फोटक स्थितीतून जात आहेत. कधीही आग लागेल अशी स्थिती असताना दिल्लीचे ‘निरो’ फक्त देशभक्तीची बासरी वाजवीत आहेत”, असं खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर हल्ला चढवला.
संजय राऊत म्हणतात, “पंतप्रधान मोदी हे अंधभक्तांचे विश्वगुरू आहेत, पण देशात सुरू असलेल्या आंतरिक सुरक्षेच्या मामल्यावर डोळे झाकता येणार नाहीत. कश्मीरात पंडितांच्या हत्या सुरूच आहेत आणि आता पंजाबात पुन्हा खलिस्तानी खदखद उफाळून येत आहे. अंधभक्तांचे विश्वगुरू त्यावर काहीच बोलत नाहीत.आमच्यासारखे देशभक्त दुसरे कोणीच नाहीत, असे ढोल रोज पिटणाऱ्यांच्या राज्यात आपण जगत आहोत. पण देशात काय सुरू आहे?”
“पुलवामातून आणखी एका कश्मिरी पंडिताची दिवसाढवळय़ा हत्या झाल्याची बातमी आली आहे. या घटनेनंतर कश्मिरी पंडितांचे आक्रोश व संतापाचे चित्र जम्मूपासून दिल्लीपर्यंत सर्वत्र दिसले. पण भारतीय जनता पक्षाने दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया यांच्या अटकेचे नाटय़ दोन दिवस रंगवून कश्मिरी पंडितांच्या आक्रोशावर पाणी ओतण्याचा प्रयत्न केला. हे असे करणे म्हणजे आपल्याच विचारांशी बेइमानी आहे”, अशा शब्दात राऊतांनी मोदी सरकारवर प्रहार केला.
Satara : आमदार फुटण्याला संजय राऊत जबाबदार, उद्धव ठाकरेंनी दूर राहावं -देसाई