‘अंधभक्तांनो, हे कधी थांबणार?’, संजय राऊतांचा थेट मोदी-शाहांवर प्रहार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Sanjay Raut RokhThok । PM Narendra Modi । Union Home Minister Amit Shah : “तुम्ही देशाचे राज्यकर्ते आहात व सध्या ‘बादशाही’ पद्धतीने राज्य करत आहात. कश्मीर व पंजाबातील घटनांपासून तुम्हाला पळ काढता येणार नाही. दोन्ही सीमावर्ती राज्ये आता स्फोटक स्थितीतून जात आहेत. कधीही आग लागेल अशी स्थिती असताना दिल्लीचे ‘निरो’ फक्त देशभक्तीची बासरी वाजवीत आहेत”, असं खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर हल्ला चढवला.

संजय राऊत म्हणतात, “पंतप्रधान मोदी हे अंधभक्तांचे विश्वगुरू आहेत, पण देशात सुरू असलेल्या आंतरिक सुरक्षेच्या मामल्यावर डोळे झाकता येणार नाहीत. कश्मीरात पंडितांच्या हत्या सुरूच आहेत आणि आता पंजाबात पुन्हा खलिस्तानी खदखद उफाळून येत आहे. अंधभक्तांचे विश्वगुरू त्यावर काहीच बोलत नाहीत.आमच्यासारखे देशभक्त दुसरे कोणीच नाहीत, असे ढोल रोज पिटणाऱ्यांच्या राज्यात आपण जगत आहोत. पण देशात काय सुरू आहे?”

“पुलवामातून आणखी एका कश्मिरी पंडिताची दिवसाढवळय़ा हत्या झाल्याची बातमी आली आहे. या घटनेनंतर कश्मिरी पंडितांचे आक्रोश व संतापाचे चित्र जम्मूपासून दिल्लीपर्यंत सर्वत्र दिसले. पण भारतीय जनता पक्षाने दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया यांच्या अटकेचे नाटय़ दोन दिवस रंगवून कश्मिरी पंडितांच्या आक्रोशावर पाणी ओतण्याचा प्रयत्न केला. हे असे करणे म्हणजे आपल्याच विचारांशी बेइमानी आहे”, अशा शब्दात राऊतांनी मोदी सरकारवर प्रहार केला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Satara : आमदार फुटण्याला संजय राऊत जबाबदार, उद्धव ठाकरेंनी दूर राहावं -देसाई

370 कलमावरून मोदी-शाहांना राऊतांचा सवाल

संजय राऊतांनी रोखठोकमध्ये म्हटलं आहे की, “370 कलम हटवले गेले ते फक्त कागदोपत्री व भाजपच्या राजकीय सोयीसाठी. कश्मीर हा हिंदुस्थानचा भाग होता व आहेच. 370 कलमाने कश्मीरला विशेष अधिकार मिळाले होते. ते काढून घेतले, पण 370 कलम हटवल्यावर कश्मिरी पंडितांना त्यांचे अधिकार मिळाले काय? याचे उत्तर भाजपचा एकही बडा नेता देऊ शकलेला नाही. 370 कलम हटवूनही मोदी-शहा पंडितांचे रक्षण करू शकले नाहीत. मेहबुबा मुफ्ती त्यावर म्हणाल्या, ‘कश्मिरी पंडितांच्या हत्या व्हाव्यात व ते असुरक्षित असावेत हीच भाजपची इच्छा आहे, कारण पंडितांच्या बलिदानावरच त्यांचे राजकारण सुरू आहे.’ मेहबुबा मुफ्ती यांच्याशी मतभेद असणाऱ्यांनाही त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधावे लागेल”, असा मुद्दा राऊतांनी उपस्थित केला आहे.

ADVERTISEMENT

हिंदू आक्रोश मोर्चांवरून भाजपवर टीकास्त्र, संजय राऊतांनी काय म्हटलंय?

“भाजपक्ष अहंकार व उर्मटपणाच्या कळसावर पोहोचला आहे व त्या टोकावरून आता त्यांना देशाचे खरे प्रश्न दिसत नाहीत. अदानी यांचा भ्रष्टाचार पाठीशी घालून त्यांना वाचविणारे सरकार कश्मिरी पंडितांना वाचवत नाही हे नोंद करण्यासारखे आहे. महाराष्ट्रासह सर्वत्र भाजपपुरस्कृत सकल हिंदू आक्रोश मोर्चे ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात काढले जात आहेत. असे सकल हिंदूंचे आक्रोश मोर्चे कश्मिरी पंडितांच्या हत्येविरोधात का निघू नयेत? या सकल मोर्चावाल्यांनी जम्मू-कश्मीरातील हिंदूंचे हाल काय ते समजून घेतले नाहीत. पुलवामाच्या बाजारात संजय शर्मांची हत्या त्यांच्या पत्नीसमोर झाली. तेथे हिंदू मोर्चा निघाला असता तर बरे झाले असते, पण तेथे शेपट्या घालायच्या व महाराष्ट्रात ‘हिंदू खतरे में’ म्हणून छाती पिटायची. हे राजकारण समाज बिघडवत आहे”, अशा शब्दात राऊतांनी भाजपवर टीकास्त्र डागलं आहे.

ADVERTISEMENT

‘कसबा तो झांकी है, महाराष्ट्र अभी; विधानसभेला तर 200..’, संजय राऊतांचा दावा

राऊतांचा मोदी-शाहांना ईडी, सीबीआय कारवायांवरून सवाल

“खलिस्तानचे गाडलेले भूत तेथे पुन्हा जिवंत होताना दिसत आहे. अमृतपाल सिंह हा खलिस्तानी चळवळीचे नेतृत्व करतोय व हिंसा घडवून आणतोय. त्याच्या चळवळीस पैसा कोठून येतोय याचा तपास करण्याची हिंमत मोदी-शहांच्या प्रिय ‘ईडी, सीबीआय व इन्कम टॅक्स’ने दाखवायला हवी. अशी हिंमत ते अदानींच्या बाबतीत दाखवू शकले नाहीत व पंजाबातील खलिस्तानवाद्यांच्या बाबतीतही दाखवणार नाहीत. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांना सीबीआयने अटक केली. तसा फास पंजाबात खलिस्तानच्या घोषणा देणाऱ्यांच्या बाबतीत का आवळला नाही? सरळ सरळ परदेशी पैसा या चळवळीत पुन्हा येऊ लागला व मोदी-शहा त्यावर गप्प आहेत”, असं राऊतांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लक्ष्य केलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT