साताऱ्यात शशिकांत शिंदेंच्या समर्थकांचा राडा! दगडफेक, अजित पवारांविरोधात घोषणाबाजी

मुंबई तक

राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेल्या आणि अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या सातारा जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांचा एका मताने पराभव झाला. राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार ज्ञानेश्वर रांजणे यांनी शिंदे यांना पराभूत केलं. या पराभवानंतर शिंदे समर्थकांनी राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयावर हल्ला केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्याविरोधात शिंदे समर्थकांनी घोषणाबाजीही केली. सातारा जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादीचे सातारा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेल्या आणि अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या सातारा जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांचा एका मताने पराभव झाला. राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार ज्ञानेश्वर रांजणे यांनी शिंदे यांना पराभूत केलं. या पराभवानंतर शिंदे समर्थकांनी राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयावर हल्ला केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्याविरोधात शिंदे समर्थकांनी घोषणाबाजीही केली.

सातारा जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादीचे सातारा जिल्ह्याचे माजी अध्यक्ष व माजी पालकमंत्री शशिकांत शिंदे यांचा एक मताने पराभव झाला. पराभवाची सल सहन न झाल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आणि शशिकांत शिंदे यांच्या समर्थकांनी थेट राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक केल्याची घटना निवडणूक निकालानंतर घडली.

Satara District Bank Result : शशिकांत शिंदे एका मताने पराभूत; शंभूराजे देसाईंनाही धक्का

यावेळी अजित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचा निषेध केला. गेल्या महिनाभरापासून जिल्हा बँक निवडणुकीचे धुमशान सुरू होते. राजकीय दृष्ट्या ही निवडणुकी महत्त्वाची मानली जात होती. त्यामुळे या निवडणुकीत साताराच्या आजी-माजी पालकमंत्र्यांचं अस्तित्व पणाला लागले होतं. जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांचा शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे ज्ञानदेव रांजणे यांनी एक मताने पराभव केला.

राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी शशिकांत शिंदे यांचा पराभव जाणीवपूर्वक केला असल्याच्या समजातून राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांविरोधात निषेधाच्या घोषणा देत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी साताऱ्यातील राष्ट्रवादी कार्यालयासमोर धुडगूस घातला. ‘शशिकांत शिंदे यांचा विजय असो’, ‘टायगर अभी जिंदा है’ अशी घोषणाबाजी करत पराभवाचा वचपा योग्य वेळी काढू अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.

Satara bank Election : भाजपच्या साथीने राष्ट्रवादीच्या सहकारमंत्र्यांनी केला ‘करेक्ट कार्यक्रम’

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनीच पक्षाच्या उमेदवारांचा पराभव केला, अशी जोरदार चर्चा आता सध्या सुरू आहे. याचे पडसाद येणाऱ्या निवडणुकीमध्ये आणि येणाऱ्या राजकीय घडामोडीमध्ये नक्कीच दिसून येतील असे चित्र आजच्या या निकालानंतर दिसू लागलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp