खळबळजनक! साताऱ्यातील पेढेवाल्या मोदींना बाँम्बने उडवून देण्याची धमकी
–इम्तियाज मुजावर, सातारा सातार्यातील मिठाई व्यावसायिकाला गेल्या 8 दिवसांपासून बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. आंतरराष्टीय नंबरवरून कॉल येत असून, 30 लाखांच्या खंडणीची मागणी केली जात आहे. पैसे न दिल्यास बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या याप्रकरणी पोलीस मुख्यालयात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. साताऱ्यातील पेढे […]
ADVERTISEMENT

–इम्तियाज मुजावर, सातारा
सातार्यातील मिठाई व्यावसायिकाला गेल्या 8 दिवसांपासून बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. आंतरराष्टीय नंबरवरून कॉल येत असून, 30 लाखांच्या खंडणीची मागणी केली जात आहे. पैसे न दिल्यास बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या याप्रकरणी पोलीस मुख्यालयात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे.
साताऱ्यातील पेढे व्यवसायिक प्रशांत मोदी यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. मागील आठ दिवसांपासून त्यांना इंटरनॅशनल कॉल येत आहेत. ’30 लाख रुपये दे, अन्यथा बॉम्ब लावून उडवून देईन’, अशी धमकी देणारे मेसेज त्यांना पाठवण्यात आले आहेत.
सातारा जिल्हा बँक निवडणूक : चार राजे बिनविरोध, पण माजी पालकमंत्र्यांसमोर विजयाचं मोठं आव्हान