कधी पायपीट तर कधी बैलगाडीने गाठावी लागतेय शाळा, ‘या’ गावातल्या मुलांना एसटी संपाचा फटका
जका खान, प्रतिनिधी, बुलढाणा महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या म्हणजेच एसटीच्या कर्मचाऱ्यांनी मागील 15 दिवसांपासून संप पुकारला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका हा सर्वाधिक ग्रामीण भागाला बसला आहे. कारण इथल्या शाळकरी मुलामुलींना शाळा गाठण्यासाठी कधी बैलगाडीचा आधार घ्यावा लागतो आहे तर कधी पायी शाळेत जावं लागतं आहे. परिवहन मंडळातर्फे मानव मिशन बस या मुलांसाठी चालवली जाते. […]
ADVERTISEMENT

जका खान, प्रतिनिधी, बुलढाणा
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या म्हणजेच एसटीच्या कर्मचाऱ्यांनी मागील 15 दिवसांपासून संप पुकारला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका हा सर्वाधिक ग्रामीण भागाला बसला आहे. कारण इथल्या शाळकरी मुलामुलींना शाळा गाठण्यासाठी कधी बैलगाडीचा आधार घ्यावा लागतो आहे तर कधी पायी शाळेत जावं लागतं आहे. परिवहन मंडळातर्फे मानव मिशन बस या मुलांसाठी चालवली जाते. मात्र संप असल्याने ती देखील बंद आहे.
वाशिम जिल्ह्यातील आवरदारी या छोट्या गावातले 20 ते 25 विद्यार्थी जऊल्का गावातल्या शिवाजी विद्यालयात शिकण्यासाठी जातात. या मुलांना शाळेत नेण्याचं आणि परत गावात सोडण्याचं काम मानव मिशन बसतर्फे केलं जात होतं. मात्र एसटीच्या संपामुळे परिवहन मंडळातर्फे चालवण्यात येणारी ही बस सेवाही बंद आहे. त्यामुळे या मुलांना शाळा गाठण्यासाठी कधी पायपीट करावी लागते आहे तर कधी बैलगाडीचा आधार घ्यावा लागतो आहे.