लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे सत्ताधाऱ्यांपैकीच-शरद पवार
लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे सत्ताधाऱ्यांपैकीच होते असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोलापुरात केला आहे. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर भाष्य करत असताना शरद पवार यांनी हा मोठा आरोप केला आहे. “आपल्या मागणीसाठी शेतकरी गेल्या अडीच महिन्यांपासून जास्त काळ दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. आम्हाला फुकट काहीही नको आमच्या घामाची किंमत आम्हाला द्या […]
ADVERTISEMENT

लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे सत्ताधाऱ्यांपैकीच होते असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोलापुरात केला आहे. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर भाष्य करत असताना शरद पवार यांनी हा मोठा आरोप केला आहे. “आपल्या मागणीसाठी शेतकरी गेल्या अडीच महिन्यांपासून जास्त काळ दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. आम्हाला फुकट काहीही नको आमच्या घामाची किंमत आम्हाला द्या असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. या आंदोलनाचं मुख्य वैशिष्ट्य हे की शेतकऱ्यांनी कायदा हातात घेतला नाही.” असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.
दिल्ली हिंसाचारावर भाष्य
“26 जानेवारीच्या ट्रॅक्टर रॅलीच्या वेळी जो काही हिंसाचार उसळला ते खरे शेतकरी नव्हते. त्यामागे शेतकरी आंदोलनाला बदनाम करणारे घटक होते, सत्ताधारी पक्षातील काही घटक होते. याबद्दल आम्ही जेव्हा खोलात जाऊन माहिती घेतली तेव्हा ही माहिती मिळाली. पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांमधले शेतकरी हे टप्प्या टप्प्याने उपोषण करत आहेत. खरेदी आणि मालाची योग्य किंमत मिळावी ही देखील शेतकऱ्यांची मागणी आहे.” असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.