शरद पवार कधीच तोडगा काढत नाहीत, खेळवत ठेवतात: नारायण राणे
सिंधुदुर्ग: ‘शरद पवार तोडगा कधीच काढत नाही. खेळवत ठेवणं त्यांचं काम आहे. कधीच काढणार नाही.’ अशी घणाघाती टीका भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला नारायण राणे यांनी सावंतवाडी येथे भेट दिली त्यावेळी त्यांनी एसटी संपावरुन महाविकास आघाडी सरकारसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. ‘एसटी संपाबाबत तोडगा निघालेला […]
ADVERTISEMENT

सिंधुदुर्ग: ‘शरद पवार तोडगा कधीच काढत नाही. खेळवत ठेवणं त्यांचं काम आहे. कधीच काढणार नाही.’ अशी घणाघाती टीका भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला नारायण राणे यांनी सावंतवाडी येथे भेट दिली त्यावेळी त्यांनी एसटी संपावरुन महाविकास आघाडी सरकारसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली.
‘एसटी संपाबाबत तोडगा निघालेला नाही. त्यालाच म्हणतात शरद पवार..’
‘एसटीच्या संपाबाबत अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यालाच म्हणतात शरद पवार.. शरद पवार तोडगा कधीच काढत नाही. खेळवत ठेवणं त्यांचं काम आहे. कधीच काढणार नाही. ते आदेश देऊ शकत नाहीत? ज्यांनी सरकार बनवलं ते शरद पवार सांगू शकत नाही? कर्मचाऱ्यांना न्याय द्या ताबडतोब. एवढं तरी सांगायला पाहिजे ना. अरे कमीत कमी आम्ही विलिनीकरण एवढ्या दिवसात करु.. तोपर्यंत पगार, ग्रेडेशन का करत नाही?’
‘आतापर्यंत दोन ग्रेडेशन पेंडिंग आहेत. अरे मग एक-एक तरी करा आणि कामावर घ्या. निलंबितांना कामावर घ्या. हे प्रश्न शरद पवारांनी बोलून दाखवले पाहिजे. सरकारला सांगितलं पाहिजे करा. अर्थमंत्र्याला बाजूला बसून फायदा काय त्या अजित पवारला? त्यामुळे शरद पवार हे कुठलाही राज्याचा प्रश्न सोडवत नाहीत.’ अशी थेट टीका नारायण राणे यांनी पवारांवर केली आहे.