Kapil Sibbal यांच्या घरासमोर युथ काँग्रेसचा राडा, शशी थरूर म्हणाले हे लज्जास्पद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कपिल सिब्बल यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या युथ काँग्रेसला शशी थरूर यांनी खडे बोल सुनावले आहेत. कपिल सिब्बल यांच्या घरासमोर युथ काँग्रेसने राडा केला आहे. त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानासमोर युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. तसंच त्यांच्या कारचीही तोडफोड केली. यावरून शशी थरूर आणि मनिष तिवारी यांनी या प्रकाराचा निषेध केला आहे.

जी हुजुरी करणार नाही असं म्हणाले होते कपिल सिब्बल

मध्य प्रदेश, राजस्थान आणि आता पंजाब काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. पंजाबमध्ये झालेला नेतृत्व बदल आणि प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिद्धू यांनी दिलेला राजीनामा यावरून काँग्रेसमध्ये घमासान सुरू असतानाच पक्षाचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पक्ष नेतृत्वाच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रयत्न केला.काँग्रेसकडे अध्यक्ष नसणं, हे दुर्दैव आहे, असं सांगत त्यांनी काँग्रेस कार्यकारी समिती बैठक बोलवण्याच्या मुद्द्यावर भर दिला. सिब्बल म्हणाले होते की, ‘मी त्या काँग्रेस सदस्यांचा प्रतिनिधी म्हणून बोलत आहे, ज्यांनी मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये काँग्रेसच्या कार्यकारी समिती आणि पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीला अध्यक्ष निवडीबद्दल पत्र लिहिलं होतं आणि अजूनपर्यंत त्याची वाट बघत आहोत’, असं सांगत सिब्बल यांनी आपली नाराजी व्यक्त केली. तसंच जी हुजुरी करणार नाही असंही वक्तव्य त्यांनी केलं होतं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या पत्रकार परिषदेनंतर काय घडलं?

ADVERTISEMENT

युथ काँग्रेसचे कार्यकर्ते कपिल सिब्बल यांच्या घरासमोर जमले. तिथे घोषणाबाजी झाली. त्यांच्या कारचीही तोडफोड करण्यात आली. या घटनेबाबत मनिष तिवारी, शशी थरूर यांनी टीका केली आहे.

ADVERTISEMENT

काय म्हणाले शशी थरूर आणि मनिष तिवारी?

मनिष तिवारी म्हणाले की सिब्बल यांच्या घरासमोर कारचं नुकसान करण्यात आलं. लोक कारवर चढलं होतं, त्यामुळे कारच्या छताचा दबला गेला आणि लोकांनी टॉमेटो फेकले. ही गुंडगिरी नाही तर काय? त्यानंतर काही वेळाने शशी थरूर यांनी ट्विट करत प्रतिक्रिाय दिली.

शशी थरूर म्हणाले की कपिल सिब्बल हे जुने जाणते काँग्रेसी आहेत. त्यांनी कोर्टात अनेकदा काँग्रेसची बाजू मांडली आहे. अशावेळी एका लोकशाही पक्षात असा प्रकार घडणं ही घटना लज्जास्पद आहे असं म्हणत शशी थरूर यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे का?

2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला. त्यानंतर राहुल गांधी यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारली आणि काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेसचं अध्यक्षपद कुणालाही मिळालेलं नाही. सोनिया गांधी या अंतरिम अध्यक्ष आहेत. कपिल सिब्बल हे काँग्रेसच्या G23 गटातले आहेत. G23 हा काँग्रेसमधला असा गट आहे ज्या गटात जुने-जाणते आणि दिग्गज नेते आहेत. त्यांना काँग्रेस सोडायचं नाही पण त्यांना असं वाटतं आहे की काँग्रेसला एका सक्षम नेतृत्वाची गरज आहे.

निवडणुका जिंकेपर्यंत काँग्रेसमध्ये हायकमांड संस्कृती मान्य होती मात्र आता या संस्कृतीलाही काही प्रमाणात विरोध होऊ लागला आहे. तुम्ही निवडणूक जिंकणार नाही, तुम्ही अध्यक्षपद सांभाळणार नाही आणि तुम्हाला हायकमांड म्हणून रहायचं आहे या भूमिकेला काँग्रेसच्या जुन्या जाणत्यांनी विरोध दर्शवला आहे. कपिल सिब्बल यांनी पत्रकार परिषद घेऊन या मुद्द्याकडे लक्ष वेधलं. तसंच काँग्रेसला सक्षम नेतृत्वाची गरज आहे असंही त्यांनी म्हटलं होतं. जी हुजुरी करणार नाही असंही वक्तव्य केलं होतं.

काँग्रेस पक्षाच्या जुन्या जाणत्या नेत्यांपैकी कपिल सिब्बल हे एक आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेतल्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांच्या घराबाहेर आंदोलन झालं आहे. त्यांच्या घराबाहेर घोषणाबाजी झाली. हे सगळं घडल्यानंतर काँग्रेसच्या इतर नेत्यांनी याचा निषेध केला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT