Shinde यांचा CM होण्याचा मार्ग कसा झालेला मोकळा?, ‘ही’ आहे जूनमधली क्रोनोलॉजी
Maharashtra Political Crisis June 2022 Chronology: मुंबई: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी आता (Maharashtra Political Crisis) अंतिम टप्प्यात आली आहे. कारण आता प्रकरणाबाबत सुप्रीम कोर्टात (Supreme Court) कधीही निर्णय देऊ शकतं. यासाठी कोर्टात प्रदीर्घ अशी सुनावणी पार पडली. यावेळी दोन्ही बाजूने प्रचंड जोरदार असे युक्तिवाद केले गेले. या सगळ्या युक्तिवादात विधानसभा अध्यक्ष, आमदार अपात्रतेचा मुद्दा आणि राज्यपालांची […]
ADVERTISEMENT

Maharashtra Political Crisis June 2022 Chronology: मुंबई: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी आता (Maharashtra Political Crisis) अंतिम टप्प्यात आली आहे. कारण आता प्रकरणाबाबत सुप्रीम कोर्टात (Supreme Court) कधीही निर्णय देऊ शकतं. यासाठी कोर्टात प्रदीर्घ अशी सुनावणी पार पडली. यावेळी दोन्ही बाजूने प्रचंड जोरदार असे युक्तिवाद केले गेले. या सगळ्या युक्तिवादात विधानसभा अध्यक्ष, आमदार अपात्रतेचा मुद्दा आणि राज्यपालांची भूमिका या सगळ्याबाबत वेगवेगळे युक्तिवाद झाले. पण या सगळ्या गोष्टींना नेमकी कशी आणि कधी सुरुवात झाली.. ठाकरे कसे गेले आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्रिपदी (CM Post) कसे आले या सगळ्याची क्रोनोलॉजीच (Chronology) आपण आपण अगदी सोप्या पद्धतीने समजून घेऊया. (thackeray paved the way for eknath shinde to become chief minister understand chronology in june 2022)
शिंदे मुख्यमंत्री पदी कसे आले?, क्रोनोलॉजी समजून घ्या!
-
21 जून 2022: एकीकडे विधान परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झालेला असताना दुसरीकडे शिवसेनेचे साधारण 30 आमदार हे अचानक नॉट रिचेबल झाले. ज्यानंतर हे सगळे आमदार सूरतला गेले असल्याचं समोर आलं.
22 जून 2022: मात्र, सूरत हे महाराष्ट्रापासून अगदीच जवळ असल्याने. आपल्यासोबत कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी एकनाथ शिंदेंनी आपल्या सगळ्या बंडखोर आमदारांना सूरतवरून थेट आसाममधील गुवाहटीत हलवलं.
23 जून 2022: एकीकडे शिवसेनेत फूट पडली असली तरीही महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र आपण शिवसेनेच्या पाठिशी कायम असल्याचं स्पष्ट केलं.










