आनंदराव अडसुळ यांची ED तर्फे City Bank प्रकरणात चौकशी; अडसुळांची तब्बेत बिघडली

मुंबई तक

मुंबई: शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या घरी आणि कार्यालयावर अंमलबजावणी संचलनालयाने (ED) छापेमारी केली असल्याची प्राथमिक माहिती समजते आहे. आज (27 सप्टेंबर) सकाळी आठ वाजेच्या सुमारास ईडीच्या अधिकाऱ्यांनी अडसूळ यांच्या मुंबईतील कांदिवलीमधील घरी छापा मारला. तसेच त्यांच्या कार्यालयावर देखील छापा मारण्यात आला. यानंतर साधारण तीन तास अडसूळ यांची चौकशी करण्यात आली. दरम्यान, ही चौकशी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या घरी आणि कार्यालयावर अंमलबजावणी संचलनालयाने (ED) छापेमारी केली असल्याची प्राथमिक माहिती समजते आहे. आज (27 सप्टेंबर) सकाळी आठ वाजेच्या सुमारास ईडीच्या अधिकाऱ्यांनी अडसूळ यांच्या मुंबईतील कांदिवलीमधील घरी छापा मारला. तसेच त्यांच्या कार्यालयावर देखील छापा मारण्यात आला. यानंतर साधारण तीन तास अडसूळ यांची चौकशी करण्यात आली.

दरम्यान, ही चौकशी सुरु असतानाच अडसूळ यांची अचानक तब्येत खराब झाली. त्यामुळे त्यांच्यासाठी तात्काळ रुग्णवाहिका बोलविण्यात आली. यावेळी त्यांना स्ट्रेचरवरून रुग्णवाहिकेत नेण्यात आलं आणि गोरेगावमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं असल्याची माहिती मिळते आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा आणि त्यातही विशेषत: ईडीचा ससेमिरा लागला आहे.

त्यातच आता शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळही हे ED च्या रडावर आले आहेत. याआधी ईडीने आनंद अडसूळ यांना समन्स बजावलं होतं. तर आज (27 सप्टेंबर) त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला.

हे वाचलं का?

    follow whatsapp