Sanjay Raut-Raj Thackery: संजय राऊतांनी ‘शिवतीर्था’वर जाऊन घेतली राज ठाकरेंची भेट, राजकीय वर्तुळात तुफान चर्चा
मुंबई: शिवसेनेचे फायरब्रँड नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बुधवारी (17 नोव्हेंबर) सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मुंबईतील ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली असल्याचं वृत्त समोर येत आहे. संजय राऊत यांनी राज ठाकरे यांची अचानक भेट घेतल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, संजय राऊत हे आपल्या […]
ADVERTISEMENT

मुंबई: शिवसेनेचे फायरब्रँड नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बुधवारी (17 नोव्हेंबर) सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मुंबईतील ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली असल्याचं वृत्त समोर येत आहे. संजय राऊत यांनी राज ठाकरे यांची अचानक भेट घेतल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, संजय राऊत हे आपल्या मुलीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी राज ठाकरे यांच्या घरी सपत्नीक गेले होते. यावेळी त्यांनी राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांना लग्नासाठी आमंत्रित केलं आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन असल्याने संजय राऊत हे श्रद्धांजली वाहण्यासाठी शिवाजी पार्कवर बाळासाहेबांच्या समाधीस्थळी आले होते. यानंतर संजय राऊत यांनी थेट राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’ या राज ठाकरेंच्या नव्या घराकडे आपला मोर्चा वळवला. यावेळी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत या देखील सोबत होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, 29 नोव्हेंबर रोजी संजय राऊत यांची कन्या पूर्वशी हिचं 29 नोव्हेंबर रोजी लग्न आहे. याच लग्नाची पत्रिका देण्यासाठी संजय राऊत हे राज ठाकरेंच्या घरी गेले होते. यावेळी बराच वेळ राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्या गप्पा झाल्या. दरम्यान, ही भेट राजकीय नसून कौटुंबिक असल्याचं संजय राऊत यांच्याकडून सांगण्यात येत आहे. मात्र, असं असलं तरीही या भेटीमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत.
संजय राऊतांना सोडण्यासाठी राज ठाकरे स्वत: आले दारापर्यंत!