Mumbai Tak /बातम्या / ठाकरेंना जबर धक्का : सुभाष देसाईंच्या कुटुंबातच फूट; पुत्र एकनाथ शिंदेंसोबत!
बातम्या राजकीयआखाडा

ठाकरेंना जबर धक्का : सुभाष देसाईंच्या कुटुंबातच फूट; पुत्र एकनाथ शिंदेंसोबत!

Shiv Sena (UBT) News :

मुंबई : शिवसेना (UBT) चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा धक्का बसला आहे. ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि शिवसेना (UBT) चे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई (Subhash Desai) यांच्या कुटुंबातच फूट पडली आहे. देसाईंचे पुत्र भूषण देसाई हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार असल्याची माहिती आहे. भूषण देसाई यांचा आज (सोमवार) शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. स्वतः भूषण देसाई यांनी ‘मुंबई तक’शी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला. (Shiv Sena (UBT) chief Uddhav Thackeray’s close Subhash Desai’s son Bhushan Desai join Eknath Shinde.)

सुभाष देसाई ठाकरे कुटुंबियांचे निकटवर्तीय :

सुभाष देसाई यांच्या मुलानेच ठाकरेंची साथ सोडल्याने ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. सुभाष देसाई शिवसेनेच्या स्थापनेपासून पक्षप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंसोबत होते. त्यानंतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याही जवळच्या गोटातील नेते मानले जाऊ लागले. पक्षसंघटनेतील काही मोजक्या जुन्या नेत्यांच्या यादीत सुभाष देसाई यांचं नावं अग्रक्रमाने घेतलं जातं. २००५ मध्ये त्यांची शिवसेनेच्या नेतेपदी निवड झाली होती.

सुभाष देसाई यांची संसदीय कारकिर्द १९९० साली सुरु झाली. १९९० मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर २००४ आणि २००९ साली ते पुन्हा विधानसभेवर निवडून गेले. २००९ ते २०१४ या काळात देसाई यांच्यावर शिवसेनेच्या विधिमंडळनेतेपदाचीही धुरा सोपविण्यात आली होती. पुढे देसाई यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात आली. या दरम्यान त्यांच्याकडे राज्याचे उद्योग मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर २०१९ मध्येही ठाकरेंच्या मंत्रिमंडळात देसाई यांची निवड झाली होती.

भूषण देसाईंवर भाजपने केले होते भ्रष्टाचाराचे आरोप अन् चौकशीचीही मागणी :

भूषण देसाई यांच्यावर महाविकास आघाडी सरकार असताना भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. वेदांता-फॉक्सकॉन आणि ‘एअरबस- टाटा’ हे प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी महाविकास आघाडीच्या काळात हे प्रकल्प गुजरातला गेल्याचे आरोप करत तत्कालिन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर आणि त्यांचा मुलगा भूषण देसाई यांच्यावर उद्योगपतींकडून टक्केवारी मागितल्याचा आरोप केला होता. तसंच ही टक्केवारी मातोश्रीवर दिली जात असल्याचही ते म्हणाले होते.

याशिवाय दोन महिन्यांपूर्वी महाविकास आघाडी सरकारच्या काळात एमआयडीसीमध्ये ३ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला होता. तसंच याप्रकरणात एसआयटी स्थापन करुन सुभाष देसाई आणि भूषण देसाई यांची चौकशी करा, अशी मागणीही भातखळकर यांनी केली होती. यानंतर आता भूणष देसाई हे स्वतः शिंदेंसोबत गेले आहेत. त्यामुळे आता याबाबत भाजपची काय भूमिका असणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

रक्षकच बनले भक्षक! पोलिसांचाच गॅगरेप पिडितेवर बलात्कार Uttar Pradesh: महिलेच्या हत्येचे गूढ 9 वर्षांनंतर एका पोपटाने उलगडलं… Shraddha Arya: बॉलिवूड अभिनेत्रीने पतीच्या वाढदिवसाला घातली बिकिनी, नेटकरी म्हणाले… प्रसुतीनंतर अभिनेत्रीचं अविश्वसनीय ट्रान्सफॉर्मेशन, घटवलं 10 किलो वजन! Amrita Ahuja: हिंडेनबर्गच्या अहवालात भारतीय वंशीय महिलेचं नाव, गंभीर आरोप 38 कोटींचा बेवारस चेक परत केला अन् जे मिळालं त्याने पायाखालची जमीन सरकली Twitter Blue tick: ब्लू टिकसाठी आता पैसे भरा, महिन्याला किती रुपये द्यावे लागणार? H3N2 Virus पासून बचावासाठी ‘या’ घरगुती गोष्टींचा आहारात करा वापर… MS Dhoni: आयपीएलमध्ये धोनी करणार गोलंदाजी? नेटमधील फोटो बघून चाहते बुचकळ्यात Anushka Sharma : ग्लॅमरस ड्रेस, पायात घुंगरांचं पैजण अनुष्काची यूनिक स्टाईल चाहत्यांना भावली वय अवघं 48…काजोल देवगणच्या बोल्ड लूकची चर्चा ‘भाबी जी घर पर हैं’ हा अश्लील शो आहे का? अंगूरी भाभी म्हणाली, ‘मी कधीही…’ हिंदू राष्ट्राचे स्वप्न महाराष्ट्रातूनच पूर्ण होईल: धीरेंद्र शास्त्री या 6 गोष्टी रोज करा.. आयुष्यभर आनंदाची खात्री Salman Khan: कोट्यवधींमध्ये फीस घेतो, तरीही राहतो 1BHK फ्लॅटमध्ये, घरात काय काय? ईशा अंबानीचा रॉयल लूक पाहतच राहाल… मोबाइल दुकानदारावर जडला जीव; पत्नीने रचला कट, पतीची निर्घृण हत्या! 4 फूट उंचीचा ‘तो’ रेसलर, WWE च्या रिंगमध्ये महिला रेसलरला केलेलं KISS बॉलिवूडच्या ललनाचा हॉट बॅकलेस अवतार गर्लफ्रेंडला परत मिळवण्यासाठी ठोठावला कोर्टाचा दरवाजा