पालकमंत्री राष्ट्रवादीला काम देतात आणि शिवसैनिकांना डावलतात ! कोकणात पुन्हा नाराजीनाट्य

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसंपर्क अभियान हाती घेतलेल्या सत्ताधारी शिवसेनेला आज कोकणात पुन्हा एकदा नाराजीचा सामना करावा लागला आहे. शिवसंपर्क अभियान यशस्वी करण्यासाठी आलेले रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत आणि सिंधुदुर्गाचे पालकमंत्री उदय सामंत यांना शिवसैनिकांच्या रागाचा सामना करावा लागला.

शिवसैनिकांनी या बैठकीत रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांना बदलून उदय सामंत यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घेण्याची मागणी केल्याचं सूत्रांकडून समजत आहे. उत्तर रत्नागिरी भागातील पाच तालुक्यांमधून (चिपळूण, गुहागर, खेड, दापोली आणि मंडणगड) विद्यमान पालकमंत्र्यांच्याविरोधात नाराजी समोर आली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात 26 मे 29 मे दरम्यान शिव संपर्क अभियान राबवले जाणार आहे. या अभियानाच्या नियोजनासाठी जिल्ह्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते चिपळूणच्या पुष्कर हॉलमध्ये एकत्र जमले होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

“कार्यकर्त्यांनी तसेच विभाग प्रमुख, गटप्रमुख, शाखा प्रमुख यांनी काय काम केले याविषयी पक्षाकडून नेहमी अहवाल मागवला जातो. मागील अडीच वर्षात रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांनी काय काम केले याचा प्रथम खुलासा करावा. पालकमंत्री जिल्ह्यात फिरकत नसल्याने कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची कामे होतात, मात्र शिवसैनिकांची कामे होत नाहीत. चिपळूण तालुक्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम पालकमंत्री करत आहेत. दापोली नगरपंचायतीच्या निवडणुकीत पालकमंत्री आले आणि दोन गटात वाद लावून निघून गेले. त्यानंतर पालकमंत्री राष्ट्रीय कार्यक्रम वगळता जिल्ह्यात कधी फिरकत नाहीत. असे पालकमंत्री रत्नागिरी जिल्ह्याला नको”, अशी मागणी उत्तर रत्नागिरीतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

चिपळूण तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर उर्वरित तालुक्यातून पालकमंत्री बदलाच्या मागणीला जोर आला. खेड-दापोली आणि मंडणगड तालुक्यातील महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनीही पालकमंत्र्यांविषयी नाराजी व्यक्त करत त्यांना बदलण्याची मागणी केली.

ADVERTISEMENT

चिपळूणमधील राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर निकम यांना विधानसभा निवडणूकीत उदय सामंत यांनी अप्रत्यक्षरित्या मदत केल्याचा आरोप करत शिवसैनिक या बैठकीत उदय सामंत यांच्याविरुद्धही आक्रमक झालेले पहायला मिळाले. उदय सामंत शिवसेनेत राहून शिवसेनेच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोपही यावेळी शिवसैनिकांनी केला.

ADVERTISEMENT

काही दिवसांपूर्वी दापोली-खेड आणि मंडणगडमध्ये रामदास कदम विरुद्ध अनिल परब यांच्यातला वाद चांगलाच रंगला होता. त्यानंतर शिवसंपर्क अभियानादरम्यान याच भागातील शिवसैनिकांनी पालकमंत्री अनिल परब आणि उदय सामंत यांच्याविरुद्ध आपली नाराजी व्यक्त केल्यामुळे कोकणात शिवसेनेचे अंतर्गत वाद अद्याप संपले नसल्याचंच चिन्ह दिसत आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT