गिरे तो भी टांग उपर…सामना अग्रलेखातून शिवसेनेच्या भाजपला कानपिचक्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

देशात सध्या पाच राज्यांच्या निवडणुकांचा ज्वर चढला आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमध्ये होणाऱ्या आगामी निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष कसून तयारीला लागले आहेत. निवडणुका जवळ आल्यानंतर नेत्यांची या पक्षातून त्या पक्षांत ये-जा सुरु झाली आहे. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमधील काही मंत्र्यांनी राजीनामा देत समाजवादी पक्षाची वाट धरली. तरीही काही दिवसांपूर्वी आलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपच पुन्हा सत्तेत येईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. यावर शिवसेनेने सामना च्या अग्रलेखातून आपल्या खास शैलीत टीका केली आहे.

आम्हीच जिंकू आम्हाला कोणाचेही आव्हान नाही असे फुगे कितीही फुगवले तरीही प्रत्येक राज्यात भाजपला संघर्ष करावा लागत आहे. पंजाबमध्ये भलेही काँग्रेससमोर अडचणींचा डोंगर आणि अंतर्गत वाद आहेत. पण पंजाबमध्ये भाजपला तिसऱ्या क्रमांकावर राहण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे, चित्र हे असे आहे. याउपही जर कोणाला वाटत असेल की आमच्यासारखे आम्हीच तर त्याला सोप्या भाषेत गिरे तो भी टांग उपर असंच म्हणावं लागेल म्हणत शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला आहे.

ओपिनीयन पोलमध्ये भाजपची आकडेवारी चांगली दाखवत असले तरीही उत्तर प्रदेशात योगींच्या मंत्रिमंडळातील तीन प्रमुख मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. भाजपच्या सहा आमदारांनी आतापर्यंत राजीनामा दिला आहे. ओपिनीयन पोलमध्ये भाजपला चांगले आकडे दाखवले जात असतानाही मंत्री आणि आमदार भाजप सोडून जात आहेत याचा अर्थ काय घ्यावा? ओपिनीयन पोल काहीही म्हणत असले तरीही जमिनीवर चित्र वेगळं आहे. भाजपच्याच मंत्र्यांना जिंकण्याची आशा वाटत नसल्यामुळे ते पटापट बुडणाऱ्या बोटीतून उड्या मारत असल्याचं शिवसेनेने आजच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

याच अग्रलेखात गोवा भाजपमधल्या परिस्थितीवर टीका करताना शिवसेनेने नाव न घेता फडणवीसांवर बोचरी टीका केली आहे. गोव्यात मंत्री मायकल लोबो यांनी भाजप सोडला, प्रवीण झांट्ये यांनीही भाजप सोडला, गोव्यात भाजपला अजुन भगदाडं पडतील. महाराष्ट्रातून गेलेले ‘पेपर सिमेंट’ ही भगदाडे रोखू शकणार नाहीत, कारण भाजपचं गोव्यातलं सरकार हे आयाराम – गयारामांच्या कुबड्यावर तयार झालं आहे असं म्हणत सेनेने फडणवीसांवरही निशाणा साधला आहे. भाजपचे गोवा निवडणुकीची जबाबदारी महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर टाकली आहे.

गोव्यात चाललंय तरी काय? पाहा कोणता नेता नेमका कोणत्या पक्षात?

ADVERTISEMENT

उत्तर प्रदेशात भाजप ब्रिटीश नितीप्रमाणे फोडा, झोडा आणि निवडणुक जिंका या तंत्राचा वापर करत असल्याचा आरोपही शिवसेनेने आजच्या अग्रलेखातून केला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT