विरार : घरजावयाचा धारदार शस्त्राने सासू आणि पत्नीवर हल्ला, पत्नीचा मृत्यू

हल्ला करुन पती फरार, पोलिसांत गुन्हा दाखल
विरार : घरजावयाचा धारदार शस्त्राने सासू आणि पत्नीवर हल्ला, पत्नीचा मृत्यू

विरार पूर्व भागातील गांधी चौक परिसरात राहणाऱ्या एका घर जावयाने आपल्या सासू आणि पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. या हल्ल्यात आरोपीची पत्नी सुप्रिया गुरवचा मृत्यू झाला असून जगदीश गुरव असं आरोपीचं नाव आहे.

गांधी चौक परिसरातील नरेंद्र माऊली या इमारतीमध्ये जगदीश गुरव आपल्या सासुच्या घरी राहत होता. आरोपीचं आपल्या सासूसोबत नेहमी भांडण व्हायचं. स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचं रविवारी आपल्या सासुसोबत भांडणं झालं. याचदरम्यान रात्री १० वाजता दारुच्या नशेत जगदीश गुरवचं गॅलरीत वाळत टाकलेल्या कपड्यांवरुन शेजाऱ्यांसोबत भांडणं झालं.

विरार : घरजावयाचा धारदार शस्त्राने सासू आणि पत्नीवर हल्ला, पत्नीचा मृत्यू
डोंबिवलीत चाललंय काय? इन्स्टाग्रामवरुन ओळख वाढवली, अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपीला अटक

तेव्हा आपल्या बाजूने भांडायला घरातून कोणीच आलेलं नसल्यामुळे संतापलेल्या जगदीशने धारदार शस्त्राने आपल्या पत्नी आणि सासुवर हल्ला केला. हल्ला केल्यानंतर जगदीश घटनास्थळावरुन फरार झाला आहे. हा प्रकार घडल्यानंतर स्थानिकांनी जगदीशच्या पत्नी आणि सासुला रुग्णालयात दाखल केलं. परंतू तोपर्यंत जगदीशच्या पत्नीने अखेरचा श्वास घेतला होता. विरार पोलिसांनी या प्रकरणात पतीवर हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

विरार : घरजावयाचा धारदार शस्त्राने सासू आणि पत्नीवर हल्ला, पत्नीचा मृत्यू
ठाण्यात पोलीस भरतीत गैरप्रकार करणं पडलं महागात, 5 जणांना अटक

Related Stories

No stories found.