कल्याण-डोंबिवली महापालिकेसाठी लवकरच निवडणुका, प्रभाग रचना जाहीर

KDMC ward composition: कल्याण-डोंबिवली महापालिकेसाठी आता लवकरच निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.
soon elections for kalyan dombivali municipal corporation ward composition announced
soon elections for kalyan dombivali municipal corporation ward composition announced

मिथिलेश गुप्ता, कल्याण: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका आता लवकरच होणार आहे. कारण या सार्वत्रिक निवडणूक 2022 करिता निवडणूक प्रभागांच्या सीमांची प्रसिद्धी, हरकती व सूचना मागविणे, सुनावणी देणे इ.चा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने सविस्तर माहिती आज (1 फेब्रुवारी) एका पत्रकार परिषदेत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जाहीर केली आहे.

मागील दीड वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. यंदा कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका पॅनल पद्धतीने होणार आहेत. कल्याण डोंबिवली महानगर निवडणुकीच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा आज प्रसिद्ध करण्यात आला.

महापालिका मुख्यालय, प्रभाग क्षेत्र कार्यालयासह पालिकेच्या अधिकृत संकेत स्थळावर हा आराखडा नागरिकांना पाहता येणार असून यावर 14 फेब्रुवारीपर्यंत हरकती सूचना नोंदवता येणार आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेची एकूण लोकसंख्या 15 लाख 18 हजार 762 इतकी गृहीत धरून प्रभाग रचना करण्यात आली आहे.

एकूण 133 सदस्य असणार असून यामधील 67 जागा महिलांसाठी आहेत. एकूण 44 प्रभाग असून यामध्ये 3 सदस्यांचे 43 प्रभाग असून सरासरी लोकसंख्या 34 हजार 258 आहे. तर 4 सदस्यांचा 1 प्रभाग आहे. ही प्रभाग रचना www.kdmcelection.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

● अशी आहे प्रभाग रचना

  • एकूण लोकसंख्या 15 लाख 18 हजार 762

  • अनुसूचित जाती : 1 लाख 50 हजार 171

  • अनुसूचित जमाती : 42 हजार 584

  • एकूण सदस्य : 133 महिला : 67

  • अनुसूचित जाती : 13 ,महिला : 07

  • अनुसूचित जमाती : 04 ,महिला : 02

  • सर्वसाधारण 116, महिला 58

  • 3 सदस्यांचे 43 प्रभाग सरासरी लोकसंख्या 34,258

  • 4 सदस्यांचा 1 प्रभाग सरासरी लोकसंख्या 45 हजार 677

प्रभाग रचना तर आधीच फोडली - राजू पाटील

वार्ड रचना आधीच फुटली आहे. याचे उमेदवारही ठरले आहेत असे वक्तव्य मनसे आमदार राजू पाटील यांनी केले आहे. प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर राजू पाटील यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी आरोप केला आहे. फायदा तोटा घेऊन आम्ही लोकांसमोर जात नाही. लोकांना वाटले मनसे पक्ष योग्य आहे तर लोक आम्हाला मतदान करणार.

आम्ही त्यांच्या अपेक्षाला उतरणार, जिसकी लाठी उसकी भैस रचना फोडली जाते. म्हणजे सत्ताधाऱ्यांनी कामे केली नाही. त्यामुळे त्यांच्या मनासारखी प्रभाग रचना करुन घेतली आहे. याचा मनसेला काही फरक पडणार नाही.

2010 साली दोन नंबरचा पक्ष होतो. तत्व विकून दुसऱ्यासोबत गेलो नाही म्हणून सत्तेत आलो नाही. लोक आम्हाला मतदान करतील. आम्ही मुद्दे घेऊन सकारात्मक विषय घेऊन जाणार आहोत. त्यामुळे आम्हाला मतदान करतील ही आम्हाला अपेक्षा आहे, असे राजू पाटील म्हणाले.

यामध्ये दिनांक 01 फेब्रुवारी 2022 रोजी निवडणूक प्रभागांच्या सीमा दर्शवणारी प्रारूप अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली असून त्यास प्रसिद्धी देण्यात येणार आहे. प्रारूप अधिसूचनेवर हरकती व सूचना मागवण्याचा कालावधी 1 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी पर्यंत असून, प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचे विवरण पत्र 16 फेब्रुवारी रोजी राज्य निवडणूक आयोगास सादर केले जाणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांमार्फत हरकती व सूचनांवर सुनावणी देण्याचा अंतिम 26 फेब्रुवारी 2022 पर्यंत आहे. सुनावणीनंतर प्राधिकृत अधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारशी विहित नमुन्यात नमूद करून विवरण पत्र राज्य निवडणूक आयोगास दिनांक 2 मार्च 2022 रोजी पाठविले जाईल.

soon elections for kalyan dombivali municipal corporation ward composition announced
KDMC Election : निवडणुकीआधीच शिवसेनेचा धमाका, भाजप माजी नगरसेवकाच्या हाती शिवबंधन

ही निवडणूक पॅनल पद्धतीने होणार असून 44 प्रभाग असणार आहेत त्यापैकी 43 प्रभाग त्रिसदस्यीय व एक प्रभाग चार सदस्यांचा असेल. त्यामुळे एकूण 133 सदस्य या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून येणार आहेत त्यापैकी 67 जागा महिलांसाठी आहेत. एकूण सदस्य संख्येपैकी अनुसूचित जातींसाठी 13 जागा राखीव असून त्यापैकी अनुसूचित जातींच्या महिलासाठी 07 राखीव आहेत.

अनुसूचित जमाती साठी 4 जागा असून त्यापैकी 02 जागा अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव आहेत. सर्वसाधारण (खुल्या) जागा 116 असून त्यापैकी 58 जागा महिलांसाठी राहणार आहेत अशी माहिती पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज दिली.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in