Sanjay Raut यांचं ते वक्तव्य काँग्रेसला झोंबलं, मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती
शिवसेना खासदार संजय राऊत यांचं एक वक्तव्य हे काँग्रेसला चांगलंच झोंबलं आहे असं दिसून येतं आहे. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत काँग्रेसच्या नेत्यांची जी बैठक झाली त्या बैठकीत त्यांनी संजय राऊत यांच्या त्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेस पक्षाने यूपीएच्या अध्यक्षपदाचा हट्ट सोडला नाही तर मग राष्ट्रीय स्तरावरचे नेते यूपीए २ […]
ADVERTISEMENT

शिवसेना खासदार संजय राऊत यांचं एक वक्तव्य हे काँग्रेसला चांगलंच झोंबलं आहे असं दिसून येतं आहे. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत काँग्रेसच्या नेत्यांची जी बैठक झाली त्या बैठकीत त्यांनी संजय राऊत यांच्या त्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
काँग्रेस पक्षाने यूपीएच्या अध्यक्षपदाचा हट्ट सोडला नाही तर मग राष्ट्रीय स्तरावरचे नेते यूपीए २ स्थापन करण्याची तयारी करत आहेत. हा निश्चित चिंतेचा विषय आहे त्यामुळे यूपीएचं अध्यक्षपद शरद पवार यांना दिलं गेलं पाहिजे. असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. यानंतर राज्य स्तरावर संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याबाबत नाराजीही व्यक्त झाली होती. आता हीच नाराजी काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे बोलून दाखवली असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे.
संजय राऊत हे शरद पवारांचे प्रवक्ते झाले आहेत: नाना पटोले
काँग्रेस पक्षाने यूपीएच्या अध्यक्षपदाचा हट्ट सोडला नाही तर मग राष्ट्रीय स्तरावरचे नेते यूपीए २ स्थापन करण्याची तयारी करत आहेत. हा निश्चित चिंतेचा विषय आहे त्यामुळे यूपीएचं अध्यक्षपद शरद पवार यांना दिलं गेलं पाहिजे
संजय राऊत, खासदार शिवसेना










